पालघर - जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. यंदाच्या मोसमात हा पहिल्यांच पाऊस आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. बच्चे कंपनीने पावसात नाचून आनंद लुटला. मात्र, पावसामुळे शहरातील वीज पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच पालघर, बोईसर, डहाणू भागात अचानक पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.