ETV Bharat / state

'पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला' - पाणी मोर्चा

महिलांनी रस्त्यावर उतरत रिकामे हंडे डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अजय भोईर या कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वतः लिहिलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधले.

Ajay Bhoi, poet
अजय भोई, कवी
author img

By

Published : Feb 11, 2020, 2:19 AM IST

Updated : Feb 11, 2020, 12:56 PM IST

पालघर - मोखाडा तालुक्यातील पाणीप्रश्न लवकर सोडविण्यात यावा यासाठी कष्टकरी संघटना व भू-पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात महिलांनी रस्त्यावर उतरत रिकामे हंडे डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही या आंदोलनाची दखल घेतली. मात्र, या आंदोलनादरम्यान अजय भोईर या कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वतः लिहिलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधले.

अजय भोईर, कवी
मोखाडा तालुका हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, या भागात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो. तरी देखील येथे बांधण्यात आलेल्या धरणांतून मुंबईकरांच्या व शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या पाण्याची गरज भागवली जाते. पण मुंबईला ज्या भागातून पाणीपुरवठा केला जातो. तेथील गावकऱ्यांचे घसे आजही कोरडेच आहेत. डोंगराच्या कडेने उतरणारे पाणी आमच्या हाताला लागत नाही म्हणत, हेच पाणी शहरात कसे पोहोचते आणि आमच्या डोंगर-दऱ्यांतून येणाऱ्या या पाण्यासाठी इथल्या महिलांना काय त्रास सोसावा लागतो. अजय भोईर आपल्या कवितेच्या माध्यमातून तितक्याच ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचवतो.आमच्या डोंगराच पाणी येतयं नर तुमच्या भितीला,पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला.....लय मोठ डोहं बनवलंतुम्ही आमच्या राना-रानात,अनं कसल पाणी उपसता गड्याबिंल्डीगिच्या उंच बनात,आमच्या डोंगराच पाणीयेतयं नर तुमच्या भितीला,पाणी आमच्या रानाचंपण शिवून न्हाय देत आम्हाला......डोंगरातली माय माझीत्या दरिखोर्‍यांतून दूडीवर दूड पाणी वाहते,अनं अनवानी पायानीचटकेही तेवढच सोसते,वरसून वर्ष पाणीतिच्या डोंगरातून येते,ते पाणी दारात आनायलातिला मात्र आयुष्य लोटावे लागते, आमच्या डोंगराच पाणी येतय नर तूमच्या भितीला, पाणी आमच्या रानाच पण शिवुन न्हाय देत आम्हाला.......

- अजय भोईर

Intro:पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला....
 Body:पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला....
 
नमित पाटील,
पालघट, दि.10/2/2020

     मोखाडा तालुक्यातील पाणीप्रश्न लवकर सोडविण्यात यावे यासाठी  कष्टकरी संघटना व भू-पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात महिलांनी रस्त्यावर उतरत रिकामे हंडे  डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही या आंदोलनाची दखल घेतली. मात्र या आंदोलनादरम्यान अजय भोई या कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांने स्वतः लिहिलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधले.

      मोखाडा तालुका हा डोंगर दऱ्यांनी वेढलेला परिसर, या भागात पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतो. तरी देखील येथे बांधण्यात आलेल्या धरणांतून मुंबईकरांच्या व शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या पाण्याची गरज भागवली जाते. पण मुंबईला ज्या भागातून पाणीपुरवठा केला जातो, तेथील गावकऱ्यांचे घसे आजही कोरडेच आहेत. डोंगराच्या कडेने उतरणारे पाणी आमच्या हाताला लागत नाही म्हणत, हेच पाणी शहरात कसे पोहोचते आणि आमच्या डोंगर-दऱ्यांतून येणाऱ्या या पाण्यासाठी इथल्या महिलांना काय त्रास सोसावा लागतो. हे अजय भोई आपल्या कवितेच्या माध्यमातून तितक्याच ताकदीने आपल्यापर्यंत पोचवतो.

आमच्या डोंगराच पाणी 
येतयं नर तुमच्या भितीला,
पाणी आमच्या रानाचं 
पण शिवून न्हाय देत आम्हाला.....

लय मोठ डोहं बनवलं
तुम्ही आमच्या राना-रानात,
अनं कसल पाणी उपसता गड्या
बिंल्डीगिच्या उंच बनात,
आमच्या डोंगराच पाणी
येतयं नर तुमच्या भितीला,
पाणी आमच्या रानाचं
पण शिवून न्हाय देत आम्हाला......

डोंगरातली माय माझी
त्या दरिखोर्‍यांतून 
दूडीवर दूड पाणी वाहते,
अनं अनवानी पायानी
चटकेही तेवढच सोसते,
वरसून वर्ष पाणी
तिच्या डोंगरातून येते,
ते पाणी दारात आनायला
तिला मात्र आयुष्य लोटावे लागते, 
आमच्या डोंगराच पाणी 
येतय नर तूमच्या भितीला, 
पाणी आमच्या रानाच 
पण शिवुन न्हाय देत आम्हाला........
   - अजय भोई

Byte-
अजय भोई- कवी( कष्टकरी संघटना कार्यकर्ता)

Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.