ETV Bharat / state

पालघर येथे बालयोगी सदानंद बाबा आश्रम बचावासाठी भक्तांचे धरणे

जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या विरोधात 22 ऑगस्ट रोजी मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील शिरासाडफाटा येथील मैदानात भक्तगणांच्या महा मेळाव्यात धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला.

बालयोगी सदानंद बाबा आश्रम बचावासाठी भक्तांचे धरणे
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:14 PM IST

पालघर - जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे भक्त या निर्णयाविरुद्ध एकवटले आहेत. आज (दि.22) मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील शिरासाडफाटा येथील मैदानात भक्तगणांच्या महामेळाव्यात धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा शांततेत पार पडला.

बालयोगी सदानंद बाबा आश्रम बचावासाठी भक्तांचे धरणे

या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू असे सांगितले. या आंदोलनाला विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. गेली 48 वर्ष तुंगारेश्र्वर येथे बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे आश्रम आहे. येथे समाजोपयोगी वनौषधी उपचार करण्यात येतात. संस्कृतीचे जतन करण्यात येते पण या आश्रमाची बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय दिल्याचा भाविकांचा आरोप आहे. या आश्रमाला जागा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारने दिली होती,असेही भक्तांचे म्हणने आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या ऑक्टोबरपर्यंत आश्रम हटविण्यात यावे,असा आदेश दिला आहे.

भक्तांचा व जनभावनेचा आदर करुन केंद्र सरकारने याविषयावर लक्ष घालावे, असे या आंदोलनाचे निमंत्रक बळीराम चौधरी यांनी सांगितले. या धरणे आंदोलनाला पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देवून तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू, असे सांगितले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार नरेंद्र मेहता, काॅ.राजेंद्र परांजपे, कैलास पाटील, ज्योती ठाकरे आदींसह भक्तगण उपस्थित होते.

Intro:बालयोगी सदानंद बाबा
आश्रम बचावासाठी भक्तांचे धरणे,एका बाजूने निर्णय दिल्याचा भक्तांचा आरोप
आश्रम बचाव समितीचा भक्त मेळावा,
आपले म्हणने सरकारपर्यंत पोहचवू- पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर (वाडा)-संतोष पाटील

पालघर जिल्ह्य़ातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचे आश्रम हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे भक्त या निर्णयाविरुद्ध एकवटले आहेत.या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी 22 ऑगस्ट रोजी मुंबई -अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील शिरासाडफाटा येथील मैदानात भक्तगणांच्या महा मेळाव्यात धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला.हा मेळावा शांततेत पार पडला.
या मेळाव्यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू असे सांगितले. या आंदोलनाला विवीध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.
मुंबई -अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड फाटा येथे बालयोगी सदानंद बाबा महाराज यांच्या भक्तांनी आश्रम बचाव समितीने 22 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन व निषेध मेळावा आयोजित करण्यात आला.
गेली 48 वर्ष तुंगारेश्र्वर येथे बालयोगी सदानंद बाबा महाराजांचे आश्रम आहे.तेथे समाजोपयोगी वनौषधी उपचार करण्यात येतात.तसेच संस्कृती जतन करण्यात येते पण या आश्रमाची बाजू नाही ऐकता एकबाजूने निर्णय दिल्याचे भाविकांचा आरोप करण्यात येतोय.तसेच या आश्रमाला जागा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारने यांनी दिली होती.असंही भक्तगणांचे म्हणने आहे. सर्वोच्च न्यायालयाने या ऑक्टोबर पर्यंत आश्रम हटविण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे.
भक्तांचा व जनभावनेचा आदर करून केंद्र सरकारने याविषयावर लक्ष घालावे.आणि हे निवडणूक पुर्वी सरकारने घ्यावा असे या धरणे आंदोलनाचे निमंञक बळीराम चौधरी यांनी वेळी सांगितले
या धरणे आंदोलनाला दरम्यान पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी भेट देवून तुमच भावना सरकार पर्यंत पोहोचवू असं त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार नरेंद्र मेहता,काॅ.राजेंद्र परांजपे,कैलास पाटील, ज्योती ठाकरे आदींसह भक्तगण उपस्थित होते.
या आंदोलनाला मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Body:पालकमंत्री रविंद्र चव्हाण
निमंत्रक बळीराम चौधरी
And other
videos Conclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.