ETV Bharat / state

Dug Well in Palghar : लहान वयात आई प्रती प्रणवची काळजी; चार दिवसात खोदली विहीर, पंचक्रोशीत होत आहे कौतुक

पालघर येथील प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने त्याने आईची काळजी घेण्यासाठी ही विहीर चार दिवसात मेहनतीने खोदली आहे.

Pranav Salkar
प्रणव सालकर यांने चार दिवसात खोदली विहीर
author img

By

Published : May 5, 2023, 9:06 PM IST

माहिती देताना सरपंच संदीप किणी

पालघर: केळवे गावात धावंगेपाडा असून येथे सहाशे ते सातशे लोकवस्ती आहे. खाऱ्या जमिनीमुळे विहीर व बोरिंगला पाणी खारट येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची चणचण आहे. नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार व गुरुवारी पाणी येते. मात्र हे पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांचे हाल होतात. असेच हाल प्रणवच्या आईचे होत होते. हाल अपेष्टा न बघवल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा चंग बांधला व त्याच्या जिद्दीने त्याने विहीर खोदून पूर्ण केली. त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले असून आईसाठी मुलाने केलेल्या या अनोख्या उपक्रमाच सरपंच संदीप किणी यांनी सुद्धा कौतुक केले आहे

आईसाठी तयार केली विहीर: तालुक्यातील केळवे धावंगेपाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर पहार व टिकावच्या साह्याने चार ते पाच दिवसात खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने, त्याने आईची काळजी घेण्यासाठी ही विहीर मेहनतीने तयार केली आहे. प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला जाते.

चार दिवसात विहीर खोदली: आईला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास बघवत नसल्याने आदर्श विद्यालय केळवे या विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणवने विहीर खोडण्याचा निर्धार केला. घराच्या अंगणात त्याने पहारीने खड्डा खोदायला सुरुवात केली. दररोज थोडा थोडा खड्डा खोदून त्याने ही विहीर चार दिवसात पूर्ण केली. बारा ते पंधरा फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागले आहे.

अखेर खड्ड्यात पाणी आले: खड्डा खोदण्यासाठी प्रणावला अथक परिश्रम घ्यावे लागले. खोल खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली व त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता. खड्डा खोदताना त्याला खडक लागले मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही काढले. अखेर खड्ड्यात पाणी आल्याने त्याचा आनंद अनावर झाला. खड्ड्यातील पाणी सालकर कुटुंब वापरण्यासाठी घेतात. त्यामुळे काही अंशी पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्याचे प्रणवच्या आईने म्हटले आहे.

विहीर खोदणाऱ्या प्रणवचा सत्कार: पालघर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी त्याचा स्थायी समिती सभेदरम्यान सत्कार करण्यात आला. यावेळी प्रणवच्या कुटुंबासाठी शबरी घरकुल योजनेतून घर देण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जाहीर केले. जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यास रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊन शबरी आवास योजनेमधून प्रणवच्या वडिलांना तात्काळ घरकुल मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अनेकांनी दिला मदतीचा हात: दरम्यान प्रणवचे हा धाडस पाहून केळवे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी प्रणवच्या नववी व दहावीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. तसचे यापुढे त्याला कुठलीही अडचण आल्यास पालक म्हणून पाठीशी राहू असेही त्यांनी म्हंटले आहे.

केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनीही घेतली दखल: प्रणवने खोदलेली विहिरीची माहिती सर्वात आधी मिळताच केळवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच संदीप किणी यांनी सर्वत्र सदर माहिती पसरवली होती. त्यानंतर त्याची दखल सर्वत्र घेण्यात आली व सरपंच संदीप किणी यांनी त्याचे कौतुक केले. तसेच कुटुंबाची भेट घेत समस्या जाणून घेऊन पाहणी केली. प्रणवने दरम्यान खोदलेल्या विहिरीला ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदर विहीर रुंद व खोल करून पावसाळ्यात विहीर ढासळू नये याकरीता सिमेंटचे पाईप विहिरीत टाकून, ती मजबूत करून देण्याचे काम सुरू केले आहे. तर त्याला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही सरपंच संदीप किणी यांनी सांगितले.

हेही वाचा: Mahalakshmi Temple Dahanu डहाणूचे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर अशी आहे मातेची आख्यायिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.