ETV Bharat / state

पालघरच्या गोऱ्हे फाट्यावरील रस्त्याची झाली चाळण - रस्त्याची झाली चाळण

गोऱ्हा फाटा ते गोऱ्हे गावापर्यंत या चार किलोमीटर अंतरावरील रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रस्त्याची झालेली चाळण
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:56 PM IST

पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हा फाटा ते गोऱ्हे गावापर्यंत या चार किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. वारंवार या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही, अशी खंत जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

गोऱ्हे फाट्यावरील रस्त्याची झाली चाळण

जोराचा पाऊस आला की येथील रस्ता नाल्याच्या पाण्यात बुडतो. यामुळे हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने अपघाताची भीती प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. गोऱ्हे फाटा ते गोऱ्हे गावं हा रस्ता मनोर-वाडा-भिवंडी या मुख्य मार्गाला जोडणारा आहे. या रस्त्याला पंचक्रोशीतील 15 ते 20 गावे जोडलेले आहेत. या परिसरात कारखाने, शाळा, महाविद्यालय असल्याने कामगारांसह विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात कमरे एवढ्या पाण्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:खड्डेमय रस्ता,दुरावस्था कायम रस्ताही खचला,अपघाती भीती पालघर (वाडा )संतोष पाटील  पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील गो-हा फाटा ते गो-हे गावापर्यंत या तीन चार किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही अशी खंत जनतेकडून व्यक्त केली जातेय.तर पुराच्या  प्रवाहात या रस्त्याच्या नाला जवळील रस्ता खचला आहे.त्यामुळे अपघाताची भीती प्रवाशी वर्गाकडून व्यक्त होतेय. पालघर (वाडा)संतोष पाटिल वाडा तालुक्यातील गो-हे फाटा ते गो-हे गावं हा मनोर -वाडा - भिवंडी या मुख्य मार्गाला जोडणारा आहे. या रस्त्याला पंचक्रोशीतील 15-20 गाव पाडे जोडले जातात.या परिसरात कारखानदारी व शाळा महाविद्यालय असल्याने विद्यार्थी आणि कामगारांसह  जनेतेचा प्रवास होत असतो.या रस्त्याने पावसाळ्यात करणे प्रवास हा वाहनचालकांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो.मनोर - वाडा -भिवंडी या महामार्गावरील गो-हे फाटा येथे 100 फुटाच्या अंतरावरचा रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून मोठे खड्डे पडले .येथून जवळून वाहणारा नाला हा पावसाळ्यात उग्र रूप धारण करत असतो.गुडघाभर तर कधी कमरे इतक्यात पाण्यातून प्रवाशी वर्गाला येथून मार्गक्रमण करावे लागते.रस्ता ही खचला आहे.आणि तेथील मोरीचा कठडा ही तुटला आहे.अशाने येथे अपघाताच्या घटनाही घडण्याची भीती व्यक्त करण्यात येते. पुर परिस्थितीत येथील वाहतूक ठप्प होते .पाऊस  उसंत देतोय यावर  इथल्या जनतेला खड्डे भरून द्यावे अशी मागणी होतेय.यातच आचारसंहितेचा भाग  राहिल्याने ही समस्येवर तोडगा हा निघेल तोवर समस्या जैसे थे स्थिती राहण्याची आणि खड्डेमय  रस्त्यातून जनतेला प्रवास करण्याची परिस्थिती ओढावली आहे. 

Body:ok

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.