पालघर - सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध अवैध्य व्यवसायावर पालघर पोलिसांकडून छापा टाकण्यात येतो. अशातच गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कासार पोलिसांनी धाड टाकून 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यामधील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 जवळ असलेल्या घोळ गावच्या हद्दीतून महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करण्यासाठी नेत असल्याची माहिती कासार पोलीसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच कासार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या टेंपोवर धाड टाकून हा मुद्देमाल जप्त केला आहे
या टेम्पो मधून पोलिसांनी 1 लाख 13 हजार 400 रुपये किमतीचा बनारसी आशिक नामक सुपारीचे 3240 पाकिटे, 56 हजार 700 रुपये किमतीचे जय अंबे इंटरप्राईजेस गोईंग तोबॅक्को 3240 बॉक्स, 76 हजार पाचशे रुपये किमतीचे पुकार पान मसाल्याचे 850 पॅकेट, 45 हजार रुपये किमतीचे सुगंधी सुपारीचे दीडशे पाकिटे, 48 हजार रुपये किमतीचे गोवा पान मसाल्याचे 400 बॉक्स, 12 हजार रुपये किमतीचे जरदा जे 405 आणि टेम्पो असा एकूण 16 लाख 2 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे.
हा प्रतिबंधित मुद्दे माल वाहून नेणारा आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मोहम्मद शकील मोहम्मद रजा याच्या विरोधात कासार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.