ETV Bharat / state

15 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास पकडले रंगेहात

गुन्ह्यातील कलमांमध्ये शिथिलता देण्यासाठी लाच मागणार्‍या बोईसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेश धुमाळ (वय 57) असे आरोपीचे नाव आहे.

15 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास पकडले

author img

By

Published : May 16, 2021, 10:58 PM IST

पालघर - गुन्ह्यातील कलमांमध्ये शिथिलता देण्यासाठी लाच मागणार्‍या बोईसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेश धुमाळ (वय 57) असे आरोपीचे नाव आहे.

गुन्ह्यातील कलमांमध्ये शिथिलता देण्यासाठी केली लाचेची मागणी

तक्रारदार यांच्या पतीला बोईसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची कलमे शिथिल करण्यासाठी राजेश धुमाळ याने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रकरणाची शहानिशा करून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजार रुपये लाच स्वीकारताना बोईसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश धुमाळ याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

हेही वाचा - 'माझा डॉक्टरांनी गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.