ETV Bharat / state

धक्कादायक..! पोलीस ठाण्यात स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

author img

By

Published : Dec 24, 2020, 11:54 AM IST

Updated : Dec 24, 2020, 12:26 PM IST

पोलीस निरीक्षकांच्या दालनात हवालदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात घडली. सखाराम भोये असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे.

police constable committed suicide by shooting himself in nalasopara
धक्कादायक! पोलीस ठाण्यात स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

पालघर/नालासोपारा - पोलीस निरीक्षकांच्या दालनात हवालदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यात घडली. सखाराम भोये असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे.

पोलीस ठाण्यात स्वत:वर गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या...

मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम भोये हे तुळींज पोलीस ठाण्यात बुधवारी नाईट ड्युटीवर कार्यरत होते. तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन, स्वत:वर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पोलीस ठाण्यात खळबळ माजली.

दरम्यान, भोये यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे कळते. पोलीस प्रशासनाने भाये यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. भोये हे मागील चार वर्षापासून पालघर जिह्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा - गडचिंचले तिहेरी हत्याकांड : आणखी २४ आरोपींना सीआयडीने केली अटक; ५ अल्पवयीनांचा समावेश

हेही वाचा - केळवे-कपासे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; 2 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अभियंता कार्यालयात खड्डे पाडू मनसेचा इशारा

Last Updated : Dec 24, 2020, 12:26 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.