पालघर- कासा पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 1 लाख 13 हजार 216 रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोळटोल नाका येथे मुंबई मार्गिकेवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी एका चारचाकीची झडती घेतली तेव्हा गाडीत तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी कारमधून 1 लाख 13 हजार 216 किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व 3 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 4 लाख 13 हजार 216 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुलमोहम्मद साफीया अहमद खान, शावान जुबेर अहमद शेख या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.