ETV Bharat / state

पालघर : आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव

विरार स्थानकात लोकल पकडण्याच्या प्रयत्नात हात सुटून लोकल व फलाटाच्या चिंचोळ्या भागात प्रवाशी अडकला. त्यावेळी ड्यूटीवर असलेले आरपीएफ जवान पंकज कुमार यांनी प्रसंगावधान राखत त्या प्रवाशाला फलाटावर खेचले.

विरार रेल्वे स्थानक
author img

By

Published : Oct 1, 2019, 8:39 PM IST

पालघर - रल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात ही घटना घडली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात हात सुटून लोकल व फलाटाच्या चिंचोळ्या भागात प्रवाशी अडकला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान पंकज कुमार यांनी प्रसंगावधान राखत त्या प्रवाशाला फलाटावर खेचले. त्यामुळे प्रवाशाचा थोडक्यात जीव वाचला.

रल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला

ही घटना रेल्वे फलाटावर लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. सदर प्रवासी सोमवारी दुपारी विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल पकडत होता. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.

हेही वाचा - 'आदित्य ठाकरे यांच्या रुपाने राजकारणात एक नवीन पर्व'

रेल्वे प्रवास करताना सुरक्षितपणे प्रवास करा, रेल्वे पुलाचा वापर करा, चालती गाडी पकडू नका अशा उद्घोषणा वारंवार रेल्वे प्रवाशांसाठी होत असतात. मात्र, प्रवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

Intro:विरार रेल्वे स्थानकावरील थरार सिसिटिव्ही कॅमे-यात कैदBody:विरार रेल्वे स्थानकावरील थरार सिसिटिव्ही कॅमे-यात कैद

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

पालघर/ विरार : आर पी एफ जवानांच्या सतर्कतेमूळे प्रवाशाचा जीव वाचला पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात धावती लोकल पकडण्याच्या नादात एका प्रवाशाचा हात सुटला .लोकल व फलाटाच्या चिंचोळ्या भागात प्रवाशी अडकून लोकलसोबत फलाटावर फरफटत जाताना ड्यूटीवर असलेल्या आर पी एफ जवान पंकज कूमार यांनी प्रसंगावधान राखत त्या प्रवाशाला फलाटावर खेचल्यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला आहे.हि घटना रेल्वे फलाटावर लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.सदर प्रवासी सोमवारी दुपारी दिड वाजता विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल सुटल्यानंतर ती पकडण्याच्या नादात त्याचा हात सुटला होतो.सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. रेल्वे प्रवास करताना सुरक्षीततपणे प्रवास करा.रेल्वे पुलाचा वापर करा,चालती गाडी पकडू नका अशा वारंवार उद्घोषणा रेल्वे प्रवाशांसाठी होत असतानाही प्रवासी मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.