पालघर - येत्या काही दिवसातच जिल्हा परिषदेची मुदत संपत आल्याने मुदत पूर्व निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर 57 जिल्हापरिषद गटांसाठी होणाऱ्या निवडणुकांची आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नियोजन समिती सदस्य, सभापती व पंचायत समितींच्या गणात बदल झाले आहेत. वाडा जिल्हापरिषद गट बाद होऊन अबिटघर हा नवा गट तयार झाला आहे. तसेच वाडा तालुक्यातील डाहे गटाचे नवे नाव गारगाव झाले असून, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या गटात आता मागास प्रवर्ग (स्त्री) आरक्षण लागू झाले आहे.
यंदा अनेक ठिकाणी आरक्षण बदलल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे.
जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणातील फेरबदल
मोज गट जिल्हा परिषद गट
जुने आरक्षण - अनुसूचीत जाती
नवीन आरक्षण - मागास प्रवर्ग (स्त्री)
पालसई जिल्हा परिषद गट
जुने आरक्षण - अनुसूचीत जमाती
नवीन आरक्षण - मागास प्रवर्ग
मांडा जिल्हा परिषद गट
जुने आरक्षण - अनुसूचित जमाती
नवीन आरक्षण - मागास प्रवर्ग (स्त्री)
अबिटर जिल्हा परिषद गट (वाडा)
जुने आरक्षण - मागास प्रवर्ग
नवीन आरक्षण - मागास प्रवर्ग (स्त्री)
कुडूस जिल्हा परिषद गट
जुने आरक्षण - मागास प्रवर्ग (स्त्री)
नवीन आरक्षण - अनुसूचित जमाती
पंचायत समितीच्या 12 जागांची आरक्षण सोडत चक्र क्रमनुसार काढण्यात आली. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, वसई आणि पालघर या तालुक्यातील पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 20 नोव्हेंबरला घेण्यात आला. यामध्ये अनुसूचित जमाती (स्त्री) व मागास प्रवर्गाची पहिली सोडत जाहीर करण्यात आली.
या आरक्षण सोडतीच्या वेळेत वाड्या्च्या प्रांत अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, आदी उपस्थित होते.
पंचायत समित्यांच्या 12 जागांची नवीन यादी
गारगाव गण - अनुसूचित जमाती (स्त्री)
डाहे गण - अनुसूचित जमाती
मोज गण - सर्वसाधारण
सापने गण - मागास प्रवर्ग (स्त्री)
गालतरे गण - अनुसूचित जमाती
माडा गण - अनुसूचित जमाती (स्त्री)
पालसई - अनुसूचित जमाती स्त्री
केळठण गण - सर्वसाधारण (स्त्री)
खुपरी गण - सर्वसाधारण
अबिटघर गण - सर्वसाधारण
कुडूस गण - अनुसूचित जमाती (स्त्री)
चिंचघर गण - अनुसूचित जमाती