ETV Bharat / state

एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द; पालघर जिल्ह्यातील मच्छीमार आक्रमक

author img

By

Published : Dec 3, 2020, 1:09 PM IST

या बंदराला आधीपासूनच विरोध होत असताना आज वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठी जेएनपीटीची माणसे येणार असल्याचे कळताच येथील नागरिकांनी विरोध केला.

मच्छीमार
मच्छीमार

पालघर - वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठी जेएनपीटीची माणसे येत असल्याचे समजतात इथल्या मच्छीमार आणि नागरिकांनी समुद्रकिनारी एकत्र येत एकच जिद्द वाढवण बंदर रद्द, अशा घोषणा देत यावेळी विरोध केला.

मच्छीमारांचा व्यवसायास बसणार फटका

पालघर जिल्ह्यातील सागरीकिनारी वाढवण येथे केंद्र सरकारचा प्रस्तावित वाढवण बंदर होण्याच्या हलचाली सुरू करण्यात येत आहेत. या प्रकल्पाने इथल्या मच्छीमारांचा व्यवसायास फटका बसणार आहे. या बंदराला आधीपासूनच विरोध होत असताना आज वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठी जेएनपीटीची माणसे येणार असल्याचे कळताच येथील नागरिकांनी विरोध केला. आम्ही वाढवण होऊ देणार नाहीत, असा पवित्रा यावेळी त्यांच्याकडून घेण्यात आला.

'भांडवलशाही नष्ट करू'

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराची जैवविविधता टिकून आहे. इथल्या मत्स्य व्यवसायातून इथले नागरिक मच्छीमारी करून उदरनिर्वाह साधत असतात. मात्र केंद्र सरकारकडून प्रस्तावित बंदर सुरू होण्याचा घाट घातला जात आहे. हे बंदर होऊ देऊ नये, यासाठी पिढ्यान् पिढ्या हा संघर्ष सुरू राहणार आहे. आम्ही जिंकणारच आहे, भांडवलशाही नष्ट करू, असा पवित्रा येथील आदिवासी एकता परिषदेचे काळूरामकाका दोधडे यांनी घेतला आहे. तर 1998ला पर्यावरण प्राधिकरणाने हे बंदर होणार नाही, तशी ऑर्डर काढली आहे. त्यामुळे हे होणार नाही, असे वाढवण बंदर संघर्ष समन्वय समितीचे वैभव वझे यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.