ETV Bharat / state

पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिन साजरा

author img

By

Published : Aug 2, 2019, 8:11 AM IST

जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते. याप्रसंगी एव्हरेस्टवीर केतन सीताराम जाधव या विद्यार्थ्याचा आणि आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण

पालघर- जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एव्हरेस्टवीर केतन सीताराम जाधव या विद्यार्थ्याचा आणि त्याच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. या व्यतिरिक्त पोलीस, कामगार आदी विभागांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण

यावेळी वनपट्टयांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत दोन अपत्यांनंतर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या मातांना 25 हजारांच्या मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. घरकुल योजनेअंतर्गत आदिम आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभांचे वाटप, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पॉवर टिलर, मत्स्यबीज, भाजीपाला बियाणे, सेंद्रीय शेती, जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने कर्ज वाटप प्रमाणपत्र, पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत गॅस जोडणीचे वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भातावरील खोडकिडीचे निर्मूलन कसे करावे याची माहिती देणाऱ्या पत्रिकेचे यावेळी अनावरण करण्यात आले.

पुढील वर्धापन दिन नवीन इमारतीमध्ये होईल-

जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. पुढील वर्धापन दिन नवीन इमारतीमधून साजरा केला जाईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले. कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्न करीत आले, हे प्रमाण कमी देखील झाले आहे तथापि लवकरच कुपोषण मुक्ती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रोजगार वाढीच्या दृष्टीने पर्यटन विकासाला चालना दिली जाईल, आरोग्य, उद्योग, मासेमारी या क्षेत्रात देखील स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. भूकंपग्रस्त भागात केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याबरोबरच हानी होऊ नये यासाठी शासकीय इमारतींचे सर्वेक्षण सुरू असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जि.प.अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, माविम अध्यक्ष ज्योती ठाकरे, आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे जगदीश धोडी, आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह, जि.प. प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील आदी मान्यवरांसह जिल्हावासीय उपस्थित होते.

Intro:पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिन साजरा
Body:पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिन साजरा

नमित पाटील,
पालघर, दि.1/8/2019

पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते. या प्रसंगी एव्हरेस्टवीर केतन सीताराम जाधव या विद्यार्थ्याला त्याच्या आई-वडिलांसह मान्यवरांच्या विशेष सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. या व्यतिरिक्त पोलीस, कामगार आदी विभागांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच वनपट्टयांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत दोन अपत्यांनंतर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या मातांना 25 हजारांच्या मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. घरकुल योजनेअंतर्गत आदिम आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभांचे वाटप, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पॉवर टिलर, मत्स्यबीज, भाजीपाला बियाणे, सेंद्रीय शेती, जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने कर्ज वाटप प्रमाणपत्र, दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत गॅस जोडणीचे वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भातावरील खोडकिडीचे निर्मूलन कसे करावे याची माहिती देणाऱ्या पत्रिकेचे यावेळी अनावरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. पुढील वर्धापन दिन नवीन इमारतीमधून साजरा केला जाईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले. कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्न करीत आले, हे प्रमाण कमी देखील झाले आहे तथापि लवकरच कुपोषण मुक्ती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रोजगार वाढीच्या दृष्टीने पर्यटन विकासाला चालना दिली जाईल, आरोग्य, उद्योग, मासेमारी या क्षेत्रात देखील स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. भूकंपग्रस्त भागात केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याबरोबरच हानी होऊ नये यासाठी शासकीय इमारतींचे सर्वेक्षण सुरू असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जि.प.अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, माविम अध्यक्ष ज्योती ठाकरे, आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे जगदीश धोडी, आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिह, जि.प. प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील आदी मान्यवरांसह जिल्हावासीय उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.