ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद

पालघर जिल्ह्यात वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा ५ एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.

Palghar District Collector Manik Gursal has ordered closure of schools from April 5 till further notice in view of rising COVID19 cases
पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद
author img

By

Published : Apr 3, 2021, 4:23 AM IST

पालघर - जिल्ह्यात वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा ५ एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच यापूर्वी विविध शाळांमध्ये आजाराचे झालेले संक्रमण लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद -
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याबाबत मान्यता देताना संबंधित शाळेतील शिक्षकांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्ती आहेत, तेथे करण्याचे निर्देशीत करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक शिक्षक बाहेर गावाहून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. हे शिक्षक कोरोना बाधित झाल्याने कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे देखील रुग्ण संख्येत वाढ होत असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, जिल्हा परिषदेचा शाळा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, निवासी शाळा, कोचिंग क्लासेस ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद
दहावी व बारावीचे वर्ग सुरू ठेवणे शाळा व्यवस्थापन यांना ऐच्छिक
जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू ठेवणे शाळा व्यवस्थापन यांना ऐच्छिक राहणार असून आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्था चालक, कर्मचारी यांना शाळेत प्रवेश राहणार नाही. तसेच आजारी असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे देखील या आदेशात आहे.

हेही वाचा - वसईत आज 358 कोरोनाबाधितांची नोंद, 2 जणांचा मृत्यू

हेही वाचा - विरार : मनिषा डोंबळ हत्या प्रकरणाचा उलगडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.