पालघर- नुकसान भरपाई, वनपट्ट्यांची मोजणी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी वाडा तालुक्यातील कम्युनिस्ट पक्षाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालसमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मागण्यापूर्ण न केल्यास चक्का जाम करू, असा इशाराही कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
वनपट्टे खात्याने जीपीएस यंत्रणेद्वारे मोजणी करून वनपट्ट्यांचे सातबारा तयार करणे, अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसान झाल्याने त्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देणे, वन खात्याच्या जमिनीत घरे बांधली आहेत. त्यांना कायदेशीर गावठाणे म्हणून मोजून देणे, दुष्काळी भागात रोजगार उपलब्ध करून रस्ते आणि विजेची सोय उपलब्ध करून देणे, ६० वर्षे वयोमान असलेल्या वृद्धांना ५ हजार रुपये पेन्शन दणे, अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील वाडा तालुका कम्युनिस्ट पक्षाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालय वाडा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा पालघर जिल्ह्यातील वाडा तहसील कार्यालयासमोर ते पुढे वाडा प्रांत अधिकारी कार्यालयसमोर पोहोचला. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषना दिल्या. नंतर वाडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. वन पट्ट्यांची प्रकरणे अजूनही मार्गी लावली जात नाही, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. कार्यकर्ते असूनही आमची कामे मार्गी लागत नाहीत, तर जनसामान्यांची काय परिस्थिती असेल, अशी कैफीयतही एका कार्यकर्त्याने मांडली. मागण्यापूर्ण केल्या शिवाय येथून हटणार नाही. चक्का जाम करू, असा इशारा देखील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता.
हेही वाचा- पालघर जिल्ह्यातील महामार्गावर रस्त्यांच्या डागडुजीमुळे संरक्षक कठड्याची उंची घटली