ETV Bharat / state

Palghar comedian Actor :  ‘हा’ विनोदी अभिनेता वृध्दापकाळात जगतोय हलाखीचे आयुष्य ! - Palghar comedian Actor

गंगूबाई नाॅन मॅट्रिक, दामिनी, चार दिवस सासूचे, समांतर, विधीलिखित, काँस्टेबल कामना कामतेकर, अवघाची संसार आदी १९५ पेक्षा अधिक मराठी टि. व्ही. मालिका, तुम बीन जाँऊ कहाँ, जिस देश में निकला चाँद, आहट अशा ३ हिंन्दी मालिका आणि ६ मराठी चित्रपटांतून विनोदी कलाकार आणि चरित्र अभिनेत्याची भूमिका, १८० व्यावसायिक रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडणारा आणि कलेच्या क्षेत्रात अनेकांना रोजगार मिळवून देणारा पालघर जिल्ह्यातील डहाणूतील ६१ वर्षीय दृष्टा कलाकार आज अत्यंत हलाखीचं जीवन जगतोय. भरत दुष्यंत जगताप ( Actor Bharat Dushyant Jagtap) असे या उमद्या कलाकाराचे नाव आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:42 PM IST

पालघर : गंगूबाई नाॅन मॅट्रिक, दामिनी, चार दिवस सासूचे, समांतर, विधीलिखित, काँस्टेबल कामना कामतेकर, अवघाची संसार आदी १९५ पेक्षा अधिक मराठी टि. व्ही. मालिका, तुम बीन जाँऊ कहाँ, जिस देश में निकला चाँद, आहट अशा ३ हिंन्दी मालिका आणि ६ मराठी चित्रपटांतून विनोदी कलाकार आणि चरित्र अभिनेत्याची भूमिका, १८० व्यावसायिक रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडणारा आणि कलेच्या क्षेत्रात अनेकांना रोजगार मिळवून देणारा पालघर जिल्ह्यातील डहाणूतील ६१ वर्षीय दृष्टा कलाकार आज अत्यंत हलाखीचे जीवन जगतोय. भरत दुष्यंत जगताप ( Actor Bharat Dushyant Jagtap ) असे या उमद्या कलाकाराचे नाव आहे.

सरकारकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा - महाराष्ट्राला कलेचा वारसा आहे. अनेक दिग्गज कलाकार या महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. मात्र आज महाराष्ट्राची सत्ता भोगणार्‍या शिंदे – भाजप सरकारचे या गंभीर विषयाकडे लक्ष आहे का ? असा सवाल कलाप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. या कलाकाराने संपूर्ण आयुष्य कलाक्षेत्राला समर्पित केले आहे. एक छोटा नाट्य, सिरियल, चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकार असलेले भरत जगताप यांनी नाटक, टि.व्ही. चित्रपट या क्षेत्रांत वेगळा असा ठसा उमटविला आहे. जगताप यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कलाक्षेत्रावर अवलंबून आहे. दरम्यान गेली अनेक वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे, भरत जगताप यांनी सांगितले.

Palghar comedian Actor
विनोदी अभिनेता भरत दुष्यंत जगताप हे वृद्धपकाळात हलाखीचे आयुष्य जगत आहेत.

भरत जगताप यांची कारकीर्द - ६१ वर्षे वय झालेल्या जगताप यांनी पूर्णपणे कलाक्षेत्राव्दारे रसिकांची सेवा करण्यासाठी याच व्यवसायाला झोकून दिले आहे. भरत जगताप यांनी आजपर्यंत अनेक व्यावसायिक नाटकांत कलाकार, दिग्दर्शक,निर्माता म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालय ( Maharashtra State Directorate of Culture ) मंत्रालय मुंबई मार्फत राज्यात ज्या नाट्यस्पर्धा घेतल्या जातात, त्या कमिटीवर जगताप हे राज्य शासनामार्फत वरिष्ठ परिक्षक म्हणून गेली २२ वर्षे काम करत आहेत. श्री स्वामीराज प्राॅडक्शनमार्फत आजपर्यंत ६५ मराठी नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शक, कलाकार म्हणून त्यांनी काम केले आहे.

सरकारची भूमिका महत्वाची - राज्यात जगताप यांच्यासारखे अनेक कलाकार आहेत, ज्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची पताका देशभर फडकवली. आजही अनेक कलाकार असे आहेत, जे कलाक्षेत्रासाठी सर्वस्व अर्पण करुन महाराष्ट्राच्या कलेचे हे वैभव जोपासण्याचे महान कार्य हे कलाकार करत आहेत. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी अर्थात वृध्दापकाळात सरकारच्या आर्थिक मदतीची गरज असताना राज्य सरकार मात्र या कलाकारांच्या कुटुंबियांकडे सर्रास डोळेझाक करत आहे. या आणि अशा अनेक कुटुबियांना सरकारी मदत देऊन राज्य सरकार या कुटुंबियांची जबाबदारी घेईल का, हा खरा ज्वलंत आणि सर्वांना अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.