पालघर - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सुरक्षित अंतर राखणे फार महत्त्वाचे आहे. पालघरमध्ये अजूनही काही ठिकाणी नागरिकांकडून 'सोशल डिस्टन्सिंग'ची पायमल्ली होताना पाहायला मिळत आहे.
पालघरकरांचा असाच बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. पालघर शहरात रास्त धान्याच्या दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धान्य खरेदीसाठी आलेल्या या नागरिकांकडून सुरक्षित अंतर राखले गेले नसल्याचे दिसून आले. राज्यासह, जिल्ह्यातही कोरोनााचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरीही कोरोनाविषयी पालघरमधील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे चित्र त्यामुळे स्पष्ट होत आहे.