ETV Bharat / state

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ - माजी मंत्री विष्णू सावरांचे पुत्र हेमंत सावरा निवडणुकीच्या रिंगणात? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION

हेमंत सावरा हे अस्थितज्ञ आहेत. पक्षातही ते जिल्हास्तरावर काम करतात. भाजपकडून या मतदारसंघात भाजपचे आदिवासी आघाडीप्रमुख हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, ज्योती भोये, मधुकर खुताडे अशी नावे  इच्छुकांच्या रांगेत आहेत.

विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Sep 25, 2019, 4:01 PM IST

Updated : Sep 26, 2019, 3:58 AM IST

पालघर (वाडा) - राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. पालघर जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा इच्छुक आहेत. आमदार विष्णू सावरा हे या विधानसभा निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा हेमंत सावरा हे येथून इच्छूक आहेत.

प्रतिनिधी संतोष पाटील यांनी घेतलेला आढावा

हेमंत सावरा हे अस्थितज्ञ आहेत. पक्षातही ते जिल्हास्तरावर काम करतात. भाजपकडून या मतदारसंघात भाजपचे आदिवासी आघाडीप्रमुख हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, ज्योती भोये, मधुकर खुताडे अशी नावे इच्छुकांच्या रांगेत आहेत.

पालघर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. या तिरंगी लढतीत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी बाजी मारली होती. शिवसेनेचे प्रकाश निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा यांना धोबीपछाड देत सावरा यांनी विजयाचा षटकार मारला होता.

हेही वाचा - राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

विष्णू सावरा हे 2019 ची विधानसभा निवडणुकीत विक्रमगडमधून लढत नाहीत. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारणही पुढे केले जाते. या जागी आपले पुञ हे निवडणुकीत इच्छुक आहेत. त्यामुळे येथे सावरांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात येतोय. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस बविआ आणि कम्युनिस्ट पक्ष यांची महाआघाडी तयार होत असल्याची चर्चा केली जाते. कारण, ही आघाडी पालघर लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती.

हेही वाचा - शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?

कम्युनिस्ट पक्षाकडून डहाणू व विक्रमगड विधानसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्याचे उभयतांमध्ये चर्चेचा खेळ चालू असल्याचे बोलले जात आहे. 2 लाखांहून अधिक मतदारसंख्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुनिल भुसारा यांचे नाव चर्चेत असुन अन्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघात कुपोषण, शेती सिंचन, पाणी टंचाई आणि रोजगार या समस्यांवर इथल्या निवडणुका लढवल्या जातात. माजी मंञी तथा आमदार विष्णू सावरा यांच्या माध्यमातून या मतदारसंघात विकासाची कामे केली असल्याचे भाजपकडून सांगितले जाते. तर, विकास झाला नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. भाजपकडून इच्छुकांची यादी वाढताना सद्याचे चित्र येथे निर्माण झाले आहे.

Intro:माजी मंत्री विष्णू सवरा यांचे पुञ हेमंत सवरा  ही विक्रमगड विधानसभा मतदारसंघास इच्छुक, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढतेय,माजी मंञी विष्णू सवरा यंदाची निवडणूक लढविण्यास पुर्ण विराम? पालघर (वाडा)संतोष पाटील  राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.पालघर जिल्ह्य़ात प्रमुख राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. यात पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र हेमंत सवरा इच्छुक आहेत.आमदार विष्णू सवरा हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत नाहीत त्यामुळे त्यांचा मुलगा हेमंत सवरा हे येथून इच्छूक आहेत. डाॅ.हेमंत सवरा अस्थी तज्ञ आहेत.पक्षातही ते जिल्हास्तरावर काम करतात.भाजपकडून या मतदारसंघात भाजपचे आदिवासी आघाडी प्रमुख  हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले,ज्योती भोये,मधुकर खुताडे अशी नावे  इच्छुकांच्या रांगेत आहेत. पालघर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ येतात.सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. या तिरंगी लढतीत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी बाजी मारली होती. शिवसेनेचे प्रकाश निकम,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा  यांना धोबीपछाड देत सवरा यांनी विजयाचा षटकार मारला होता.2019 ची विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विक्रमगड मधून लढत नाहीत.प्रकृती अस्वस्थता कारणही पुढे केले जाते.या जागी आपले पुञ हे निवडणूकीत इच्छूक आहेत. त्यामुळे येथे सवरांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात येतोय. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस बविआ आणि कम्युनिस्ट पक्ष यांची महाआघाडी तयार होत असल्याची चर्चा केली जाते.   कारण ही आघाडी पालघर लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती. कम्युनिस्ट पक्षाकडून डहाणू व विक्रमगड विधानसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्याचे उभयतांमध्ये चर्चेचा खळ  चालू  असल्याचे बोललं जातेय.2 लाखांहून अधिक येथे मतदारसंख्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा सुनिल भुसारा यांचे नाव चर्चेत असुन अन्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.  हा मतदारसंघात कुपोषण, शेती सिंचन,पाणी टंचाई आणि रोजगार या समस्यांवर इथल्या निवडणूका लढविल्या जातात.माजी मंञी तथा आमदार विष्णू सवरा यांच्या माध्यमातून या मतदारसंघात विकासाची कामे केली असल्याचे भाजपकडून सांगितले जाते.तर विकास झाला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. भाजप कडून इच्छुकांची यादी वाढताना सद्या चित्र येथे निर्माण झाले आहे. 

Body:with a walkthrough & analysis

Conclusion:ok
Last Updated : Sep 26, 2019, 3:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.