ETV Bharat / state

इमारतीच्या छतावरून खाली पडून एकाचा मृत्यू; पालघरमधील घटना - Sarfuddin Shaikh death palghar

सरफुद्दीन शेख हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या छतावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना अचानक चक्कर आली. या घटनेत ते छतावरून थेट खाली जमिनीवर पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तत्काळ पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सरफुद्दीन यांना मृत घोषित केले.

building
जय अपार्टमेंट, पालघर
author img

By

Published : Dec 9, 2019, 11:00 PM IST

पालघर - शहरातील मनोर रस्त्यालगत असलेल्या गावडे चाळीतील जय अपार्टमेंट या इमारतीच्या छातावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सरफुद्दीन शेख (वय 35), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक चक्कर आल्याने ते खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

इमारतीच्या छतावरून खाली पडून एकाचा मृत्यू

सरफुद्दीन शेख हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या छतावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना अचानक चक्कर आली. या घटनेत ते छतावरून थेट खाली जमिनीवर पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तत्काळ पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सरफुद्दीन यांना मृत घोषित केले.

हेही वाचा - चिमूरमध्ये वीज टॉवरवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात गेले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:पालघर- मनोर रस्त्यालगत गावडे चाळ - जय अपार्टमेंट इमारतीच्या टेरेसवरून खाली पडून सरफुद्दीन शेख (वय 35 ) यांचा मृत्यू Body:पालघर- मनोर रस्त्यालगत गावडे चाळ - जय अपार्टमेंट इमारतीच्या टेरेसवरून खाली पडून सरफुद्दीन शेख (वय 35 ) यांचा मृत्यू 

नामित पाटील,
पालघर, दि.9/12/2019

   पालघर शहरातील पालघर- मनोर रस्त्यालगत  असलेल्या गावडे चाळ येथील जय अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून खाली जमिनीवर पडून सरफुद्दीन शेख (वय 35 ) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या टेरेसवर असताना चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते.

     पालघर- मनोर रस्ता रस्त्यावरील गावडे चाळ परिसरात असलेल्या जय अपार्टमेंट येथील रहिवासी सरफुद्दीन शेख (वय 35) हे जेवण झाल्यानंतर  दुपारी दोन वाजताच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर फिरण्यासाठी गेले. मात्र तेथे अचानक त्यांना चक्कर आल्याने शेख इमारतीच्या टेरेसवरून खाली जमिनीवर पडले. जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या शेख यांना आसपास असलेल्या नागरीकांनी लगेचच पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सरफुद्दीन यांना मृत घोषित केले. 

    या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पालघर पोलिस घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. पालघर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नक्की कारण काय याबाबत पालघर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.