ETV Bharat / state

वर्षाचा शेवटचा गुरुवार ठरला घातवार - accident on ahmedabad highway

मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरागाव वेगात जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी स्लीप झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली.

accidents on mumbai ahmedabad highway
वर्षाचा शेवटचा गुरुवार ठरला घातवार
author img

By

Published : Dec 31, 2020, 3:16 PM IST

पालघर- मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरागाव वेगात जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी स्लीप झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी आहे.
राजेश बजरंगी सिंह असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नालासोपाऱ्यात वास्तव्यास आहे. तर मूनशी माजी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. वसई कॉमन चिंचोटी सागपाडा येथील रहिवासी आहे. दुर्घटनेनंतर तात्काळ रुग्णवाहिकेने दोघांना बावखळ येथील हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकावर उपचार सुरू केले आहेत तर एकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

रायगड

मुंबईहून कणकवलीकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस कशेडी घाटातील 50 फूट दरीत कोसळली. या अपघातात आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. साई राणे असे मृत मुलाचे नाव आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना पोलादपूर रुग्णालयात दाखल केले आहे. भोगाव गावाजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात घडला.

मुंबईहून चिंतामणी ट्रॅव्हल्स याकंपनीची खासगी बस 31 प्रवाशांना घेऊन कणकवलीकडे चालली होती. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पहाटे चार वाजता बस आली. असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 फूट दरीत कोसळली. सुदैवाने बस एका झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुणे

हडपसर परिसरात आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाली आहेत. हडपसर परिसरातील फुरसुंगीमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय 32) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रमोद मालुसरे (वय 38) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.

बीड

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांपैकी अंबाजोगाई येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्ता ठोंबरे जागीच ठार झाले. अंबाजोगाई ते अंबा साखर कारखाना रोडवरील जोगाईवाडी चौकाजवळ अज्ञात वाहनाने जॉगिंग करत असताना दत्ता ठोंबरे यांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता, की अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दत्ता यांच्या शरीराचे दोन भाग झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत दत्ता पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी असून टिळक नगर येथे पिठाच्या चक्कीचा व्यवसाय आहे. माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

कराड (सातारा)

जीमला निघालेला दुचाकीस्वार तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाला. कराड-पाटण मार्गावरील विजयनगर (ता. कराड) येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली. हणमंत भीमसेन इटकर (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, कराड-पाटण मार्गावर दाट धुके होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

हणमंत इटकर हा तरुण विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तो गवंडी काम करतो. कर्नाटकातील उडपी परिसरात तो काम करत होता. काही दिवसांपुर्वीच तो विजयनगरमधील बालाजी कॉलनीत आपल्या कुटुंबीयांकडे आला होता. तसेच दोन दिवसांपासून तो विमानतळ-मुंढे येथील जीमला जात होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.