ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार-बसचा अपघात; दोघांचा मृत्यू - पालघर अपघात बातमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर आगाराची एसटी बस बोरिवलीहून बोईसरच्या दिशेने निघाली होती. महामार्गावरील वरई-ढेकाळे (वरई फाटा) उड्डाणपुलावरून उतरत असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कारला धडकली. अपघात झाल्या क्षणीच कार व बसने पेट घेतला. या आगीत बस व कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

palghar accident news
palghar accident news
author img

By

Published : Aug 13, 2020, 6:16 PM IST

Updated : Aug 13, 2020, 8:34 PM IST

पालघर - मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाट्याजवळ कार व एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकासह सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे. त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर आगाराची एसटी बस बोरिवलीहून बोईसरच्या दिशेने निघाली होती. महामार्गावरील वरई-ढेकाळे (वरई फाटा) उड्डाणपुलावरून उतरत असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कारला धडकली. अपघात झाल्या क्षणीच कार व बसने पेट घेतला. या आगीत बस व कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

या अपघातात कार चालकाचा लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर एसटी बस चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Last Updated : Aug 13, 2020, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.