वसई-विरार (पालघर) - कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. वसई विरारमध्येही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी वसई आणि विरारमध्ये ११ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णांसह एकूण आकडा २०० वर पोहोचला आहे.
विरार पूर्वेकडील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे आहे. दोघेही मुंबईतील एका हॉटेलचे कर्मचारी आहेत. दोघांनाही मुंबईत काम करीत असलेल्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यांत आले आहे.
तसेच विरार पूर्वेकडील कॅटरर्समधील एका २२ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान दुसरा रुग्णदेखील याच परिसरातील असून तो मुंबईच्या धारावीत फूड डिस्ट्रिब्युटरचे काम करित होता. या रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील एक ५८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह असुन तो कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांच्या हायरिक्स संपर्कातील आहे. रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात दाखल केले आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील २१ वर्षीय महिला आणि ५४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. या महिलेने मुंबईचा प्रवास केला होता. तिथे तिने जोगेश्वरी येथील रुग्णालयात भेट दिल्याची माहिती आहे.
मुंबई येथील पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. विरार पश्चिमेत एका रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील व्यक्तीला बाधा झाली आहे.
५१ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळला असून तो रुग्ण मुंबई येथील रुग्णालयाचा कर्मचारी (तारतंत्री) आहे. रुग्णांस काम करिता असलेल्या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.