ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळाचा पालघरमधील ग्रामीण भागात प्रभाव कमी - palghar news

निसर्ग चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाी छोटे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

palghar
निसर्ग चक्रीवादळाचा पालघरमधील ग्रामीण भागात प्रभाव कमी
author img

By

Published : Jun 3, 2020, 10:44 PM IST

पालघर - निसर्ग चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाी छोटे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला नाही. त्यामुळे मोठी वित्तहानी व जीवितहानी झाली नसल्याची माहिती तालुक्यातील विविध तहसील कार्यालयातून सांगितली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेथे निसर्ग चक्रीवादळ तयार झाले होते. हे निसर्ग चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील जनतेला प्रभावित करणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू किनारी भागात जनतेच्या बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली होती. या वादळाचा तडाखा हा किनारपट्टीवरील जिल्ह्यातील 22 गावांना बसत होता. यामध्ये 21 हजार 80 लोक बाधित होणार होते. डहाणू किनारच्या 1 हजार 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. मात्र, या चक्रीवादळामुळे कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झाली नसल्याचे डहाणू तहदिलदार राहुल सारंग यांनी सांगितले.

वाडा आणि जव्हार या तालुक्यातील तहसीलदारांकडून कुठलीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही असे सांगण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळाने या किनारपट्टीची दिशा बदल्याने हे वादळ कोसो दूर राहिले. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. वाऱ्याचा वेगही अपेक्षीत या वादळसारखा नव्हता. त्यामुळे पालघर जिल्ह्यात त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मेट गावातील एका शेतकऱ्याच्या घरावर झाड पडून त्याच्या घराचे नुकसान झाले असल्याचे स्थानिक गावकऱ्यांकडून सांगितले जाते. एकंदरीत पालघर जिल्ह्यात चक्रीवादळ ओसरेपर्यंत जिल्ह्यावर प्रभावित करणारी घटना घडली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.