वसई (पालघर) : निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील १२ ग्रामपंचायती, काही महापालिका, पाचू बंदर, ससुनवघर इत्यादी ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळ : एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये तैनात
वसई तालुक्यातील २९ ठिकाणच्या शाळांमध्ये निसर्ग वादळाने बाधित होऊ शकतील अशा नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) 2 तुकड्या वसईत तैनात करण्यात आल्या आहेत. वसई-विरार तालुक्याच्या किनारपट्टी भागात असणाऱ्या अर्नाळा, कळंब, राजोडी, पाचुबंदर, ससुनवघर, कामण या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कच्या घरात राहणाऱ्या नागरिकांची परिसरातील शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.