ETV Bharat / state

कोकेन विकणाऱ्या नायजेरियनला नालासोपाऱ्यात अटक - पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक संदीप व्हसकोटी

नालासोपारामध्ये पूर्वेकडील परिसरात मंगळवारी संध्याकाळी नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळीज पोलिसांना मिळाली. त्यानंतर तुळीज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने सदर ठिकाणी सापळा रचून लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला पकडले आहे.

Nigerian arrested in Nalasopara
नालासोपारामध्ये नायजेरियनला अटक
author img

By

Published : Oct 8, 2020, 2:59 PM IST

पालघर (नालासोपारा)- पूर्वेकडील परिसरात मंगळवारी संध्याकाळी नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळीज पोलिसांना मिळाली. त्यानंतर तुळीज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने सदर ठिकाणी सापळा रचून लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला पकडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगर परिसरातील मार्केटजवळ नायजेरियन लाखो रुपयांचे कोकेन विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक संदीप व्हसकोटी, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, सुखराम गडाख, योगेश नागरे, अशपाक जमादार या टीमने सदर परिसरात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून असताना एक नायजेरियन संशयास्पद रस्त्याने चालत येताना पोलिसांना दिसला. 5 वाजता पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेत झडती घेतली. तर त्याच्याकडे 3 लाख 33 हजार 200 रुपयांचे 33 ग्रॅम 200 मिलीग्रॅम कोकेन पोलिसांना सापडले. उजोईओ जोसेफ एम्मानऍ, असे पकडलेल्या नायजेरियन आरोपीचे नाव असून तो मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहत होता.

नालासोपारा शहरात पूर्व आणि पच्छिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत अंदाजे 2 ते 3 हजार नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.