पालघर - मच्छिमारीसाठी चाललेल्या केळवे येथील मच्छिमाराला समुद्रकिनारी एक डॉल्फिन मासा आढळून आला. या डॉल्फिन माशाला मच्छिमाराने सुखरूप खोल समुद्रात सोडून त्याला जीवदान दिले.
डॉल्फिनला सुखरूप सोडले
पालघर तालुक्यातील केळवे येथील राकेश लक्ष्मण मेहेर हे मच्छिमार करतात. ते केळवे समुद्रात मच्छिमारीसाठी चालले होते. गुरुवारी (27 मे) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना केळवे समुद्रकिनारी एक डॉल्फिन मासा आढळून आला. हा डॉल्फिन मासा अत्यंत थकलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रमेश मेहेर यांनी समुद्र किनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिन माशाला सुखरूप खोल समुद्रात सोडून त्याला जीवदान दिले. खोल समुद्रात सोडताच डॉल्फिन मासा काही क्षणातच समुद्रात दिसेनासा झाला.
हेही वाचा - आजीबाईंची मुख्यमंत्र्यांना साद, प्रशासनाची उडाली झोप