नालासोपारा (पालघर) - नालासोपारा पूर्वेतील तुळींज येथे आप्पानगर परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान जुगार खेळणाऱ्या ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा पुन्हा उद्रेक.. राज्य सरकार मुंबई -दिल्ली विमान व रेल्वे सेवा करणार बंद ?
पोलिसांची कारवाई
तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील आप्पानगर परिसरात बेकायदेशीररित्या जुगाराचा अड्डा चालवला जात होता. विशेषतः हा अड्डा टोकन पद्धतीने सुरू होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच वसई गुन्हे शाखा व तुळींज यांच्या भरारी पथकाने या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. याप्रकरणी तीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९२ हजार रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा - पाकिस्तानात आढळले 1 हजार 300 वर्ष जुने विष्णुचे मंदिर