ETV Bharat / state

पालघरमध्ये मुस्लीम बांधवांच्या पुढाकाराने हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार - lockdown in palghar

मनोर येथील वृद्धाश्रमातील एका महिलेचा शनिवारी (4-मार्च) रुग्णालयात मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्याने मनोरमधील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेत मुलाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

palghar funeral news
पालघरमध्ये मुस्लीम बांधवांच्या पुढाकाराने हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार
author img

By

Published : Apr 6, 2020, 4:49 PM IST

पालघर - मनोर येथील वृद्धाश्रमातील एका महिलेचा शनिवारी (4-मार्च) रुग्णालयात मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्याने मनोरमधील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेत मुलाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

मुंबई-अहमदाबाद महामार्गलगत असलेल्या वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे (वय-८९) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. पुढील दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुलगा प्रकाश बिनसाळे हे मनोरला पोहोचले. परंतु लॉकडाऊनमुळे आपल्या आईचा मृतदेह मुंबईला नेणे शक्य नसल्याने मनोर येथेच आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

palghar funeral news
पालघरमध्ये मुस्लीम बांधवांच्या पुढाकाराने हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार

अशावेळी मनोर परिसरातील मुस्लीम बांधवांनी या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. रुग्णवाहिका चालक बिलाल रईस यांच्यासह बिलाल खतीब, रयान दलवी, फरहान दलवी आणि युसूफ मेनन यांच्या मदतीने मनोर येथील हात नदी वरील स्मशानभूमीत त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाविरुद्ध लढताना मनोरच्या मुस्लीम बांधवांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.