ETV Bharat / state

बोईसरमध्ये दारुसाठी पैसे न दिल्याने नातेवाईकाची हत्या, आरोपी गजाआड

राज्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे मंगळवारी बोईसर येथे दारूमुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Palghar
नातेवाईकाची हत्या
author img

By

Published : May 8, 2020, 12:39 PM IST

पालघर - दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून लाकडाच्या दांडक्याने डोक्यात वार करून एका नातेवाईकाची हत्या घटना बोईसरमध्ये घडली आहे. रामविलास राजभर असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर जगणदेव राजभर, असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. मात्र, राज्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे मंगळवारी बोईसर येथे दारूमुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

बोईसर येथे मुळचे राजस्थानचे असणारे जगणदेव राजभर आणि रामविलास राजभर हे चहाची टपरी चालवत होते. यावेळी या दोघांमध्ये जेवण बनवणे आणि दारुवरून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरुन रामविलास राजभर याने जगणदेव राजभर यांच्या डोक्यात दांडक्याने वार केले. यात जगणदेव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.