ETV Bharat / state

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या; शिवसेना खासदार राजेंद्र गावितांचे उद्धव ठाकरेंना पत्र - खासदार राजेंद्र गावितांचे उद्धव ठाकरेंना पत्र

पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आदी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांना मैदानात उतरविले आहे.

राजेंद्र गावित
राजेंद्र गावित
author img

By

Published : Jul 10, 2022, 5:08 PM IST

Updated : Jul 10, 2022, 5:18 PM IST

पालघर - भाजपा समर्थित आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आदी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांना मैदानात उतरविले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्यामुळे उद्धव ठाकरे हे आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार गावित

काय आहे पत्रात ? : दिवंगत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार तथा पहिल्या मराठी भाषिक प्रतिभा पाटील तसेच प्रणय मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता आणि दोघेही देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. या गोष्टीचे स्मरण करून आपण आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन आदिवासी समाजाचा सन्मान करावा, त्या देशाच्या आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास देशातील तमाम आदिवासी समाज आपला ऋणी राहील, अशा विनंतीचे पत्र खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

‌देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षे होत आहे. एकीकडे देशाचा आजादी अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील आदिवासी समाज राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुपोषण, या समस्या आदिवासी समाजात गंभीर आहेत. हे सर्व चित्र बदलण्यासाठी शिवसेनेने व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी एका पत्राद्वारे शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Rebel MLA : आरशात पाहतानाही लाज वाटते, संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

Last Updated : Jul 10, 2022, 5:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.