पालघर - आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घटनाबाह्य व बेकायदेशीररित्या काम करत असल्याचा आरोप पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. आदिवासींच्या जमीन विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महसूल मंत्र्यांवर आरोप -
महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा असतानाही मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासींचे जमीन हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे. महसूलमंत्री, महसूल विभाग या सर्व परवानग्या देत असल्याचा गंभीर आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या जमिनीची मागणी वाढली आहे.
आदिवासी जमीन विक्रीच्या चौकशीची मागणी -
आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे, असा आरोप खासदार गावित यांनी केला आहे. आदिवासींच्या जमीन विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी खासदार गावित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.