ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात भातशेतीला अती पावसाचा फटका; नुकसान भरपाईची मागणी - heavy rain rice crop loss palghar

पावसामुळे व वाऱ्यामुळे उभे राहिलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे, कोरोना संकटाबरोबरच आता नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत व शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

भात पीक
भात पीक
author img

By

Published : Sep 23, 2020, 8:12 PM IST

पालघर- जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडणाऱ्या अती पावसाचा परिणाम भात पिकावर जाणवू लागला आहे. भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाऊस असाच सुरू राहिला, तर हाताशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

माहिती देताना शेतकरी सुधाकर भोईर

जिल्ह्यात बहुतांश जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनला सुरुवात होते. त्यानंतर शेतकरी भात पिकाची लागवड करतात. पीक तयार होण्यासाठी साधारणतः ८० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी देखील आता जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे भागात अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे व वाऱ्यामुळे उभे राहिलेले भात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे, कोरोना संकटाबरोबरच आता नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत व शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- विविध प्रलंबित मागण्यांसाठी महावितरण अभियंत्यांचे आंदोलन; काळ्या फिती लावून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.