ETV Bharat / state

पालघरच्या विकासावरून बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे गणपतीप्रमाणे विसर्जन केले पाहिजे - बच्चू कडू

मुंबईपासून पालघर १०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरीही या जिल्ह्यात रस्ते, वीज आणि पाणी नाही. मग असला मुख्यमंत्री काय कामाचा, असे म्हणत बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली.

बच्चू कडू
author img

By

Published : Jun 22, 2019, 3:52 AM IST

पालघर (वाडा) - सरकारने स्मारके बांधण्यापेक्षा जर दवाखान्यांची स्मारके बनवली तर या देशातील गरिबी दूर होईल, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केले. ते शुक्रवारी विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.

बच्चू कडू

विक्रमगड मधील झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा आरोग्य आणि निसर्गाचा महायज्ञ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या. तसेच अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित गोरगरिब लोकांना विविध आजारावरील आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या.

मुंबईपासून पालघर १०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरीही या जिल्ह्यात रस्ते, वीज, आणि पाणी नाही. मग असला मुख्यमंत्री काय कामाचा असे म्हणत त्यांनी गणेशाचे विसर्जन करतात तसे मुख्यमंत्र्याचे विसर्जन केले पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यावर टीका केली. थापा देवून चालत नाही, कृती महत्वाची आहे. असे म्हणत त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संस्थेचे निलेश सांबरे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

Intro:स्मारके बांधण्यापेक्षा गावकऱ्यांची स्मारके करा
तर गरीबी जाईल,मुख्यमंत्र्यांचे गणपतीसारखे विसर्जन केले पाहिजे - आमदार बच्चू कडू यांचे प्रतिपादन

पालघर (वाडा) - संतोष पाटील

सरकारने स्मारके बांधण्यापेक्षा जर गावकऱ्यांची स्मारक केली तर या देशातील गरीबी दूर होईल असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.या वेळी क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड इथल्या झडपोली गावात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा आरोग्य आणि निसर्गाचा महायज्ञ 21 जुन च्या या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमात दरम्यान विवीध आजारावर आरोग्य सेवा उपस्थित गोरगरीब जनतेला पुरविण्यात आल्या.तसेच व महीलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन वाटप आणि अॅम्ब्यूलन्सचेही लोकार्पण आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला.
यांना सामाजिक कार्याचा गौरव करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. मुंबईच्या 100 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्य़ात सडक,लाईट आणि पाणी नाही. मग असला मुख्यमंत्री काय कामाचा.अशा मुख्यमंत्र्याचे गणेशाचे विसर्जन करतात तसे केले पाहिजे असे त्यांनी वक्तव्य करून मुख्यमंत्र्यावर टिका केली.
तसेच थापा देवून चालत नाही कृती महत्वाची आहे.स्मारके बांधण्यापेक्षा गावकऱ्यांची स्मारके बनवा तर इथली गरीबी जाईल.असा खरपूस समाचार सरकारचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला.यावेळी संस्थेचे निलेश सांबरे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. Body:बच्चू कडू यांचा व्हिज्युअल Conclusion:यस
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.