ETV Bharat / state

पालघरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकाने बाजारपेठा बंद; एसटी, रिक्षा सेवा सुरू - पालघर दुकाने बाजारपेठा बंद न्यूज

पालघर शहरातील व्यापारी, दुकानदारांनी यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. शहरातील दुकाने, बाजारपेठा सकाळपासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी तीन व सहा आसनी रिक्षा सेवा तसेच एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

पालघर भारत बंद न्यूज
पालघर भारत बंद न्यूज
author img

By

Published : Dec 8, 2020, 1:22 PM IST

पालघर - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशात आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातही बंद पाळण्यात येत आहे. पालघर शहरात दुकाने, बाजारपेठा बंद असून रिक्षा एसटी सेवा सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पालघरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

पालघरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकाने बाजारपेठा बंद; एसटी, रिक्षा सेवा सुरू

पालघरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद -

पालघर शहरातील व्यापारी, दुकानदारांनी यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. शहरातील दुकाने, बाजारपेठा सकाळपासूनच पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये यासाठी तीन व सहा आसनी रिक्षा सेवा तसेच एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - भारत बंद : मुंबईत बेस्टच्या ८४ टक्के तर एसटीच्या ३२ टक्के बस रस्त्यावर

सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा बंदला पाठिंबा -

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले तीन कायदे रद्द करावे या मागणीसाठी देशभरातील सर्व प्रमुख शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला असून या भारत बंदला पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी जाहीर सक्रिय पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आदिवासी आणि शेतमजूरांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना आणि लंगर संघटना अशा अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी -

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या काद्याविषयी काही शंका आहेत, त्यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजपा सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. हे शेतकरी विरोधी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या बंदला पाठिंबा देऊन केली आहे.

हेही वाचा - भारत बंद.. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.