पालघर - वसईमध्ये भव्य मिसळ महोत्वाचे आयोजन करण्यात आले होते. वसई पश्चिम येथे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हा मिसळ महोत्सव भरवण्यात आला. मिसळ खवय्यांना अस्सल मराठमोळ्या विविध प्रकाच्या मिसळ येथे चाखायला मिळाल्या. वसईत सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात बंबातली मिसळ, माठातली मिसळ, पुणे- कोल्हापूरची झक्कास मिसळ, पारनेरची झटकेदार मिसळ, नाशिकची मूग- मटकी मिसळ ठाण्याची मामलेदार मिसळ, नांदेडची मिसळ, कणकवलीची मिसळ वडे, कोल्हापूरच्या झणझणीत मिसळबरोबर दांडगा पैलवान कट वाड अशा ५० ते ६० स्वादांच्या वेगवेगळ्या चवींच्या मिसळ खाण्यासाठी लोक गर्दी करत होते. याच जोडीला काल्या रश्याची मस्त मिसळ चमचमीत मिसळ व तांवड्या रश्याच्या झणझणीत मिसळीने अनेकाच्या तोंडाला पाणी सुटले होते. हिरव्या रश्याची मस्त मिसळ,चुलीवरची गावरान मिसळ म्हणजे खवय्याना पर्वणीच होती. या ठिकाणी कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पुणे, कणकवली यासह विविध भागातील मिसळ उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तिखट खाल्यानंतर छान गोड व थंड पदार्थ देखील मिसळ महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. यात खरवस, औरंगाबाद पान, यश गोळा, मॉजीटो मॉकटेल चाखायला ही लोकांनी गर्दी केली होती.