ETV Bharat / state

चक्रीवादळ : नुकसानग्रस्त भागाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

पालघर जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

पाहणी करताना
पाहणी करताना
author img

By

Published : May 24, 2021, 8:04 PM IST

पालघर - जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी चक्रीवादळातील नुकसाग्रस्त भागाचे पंचनामे करून तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालघरमधील मनोर रोडजवळील परदेशी चाळीतील 100 वर्षापूर्वीचे एक जुने पिंपळाचे झाड चक्रीवादळात कोसळले. या दुर्घटनेत 10 घरांचे नुकसान झाले आहे. मनोर गावातील म्हसकरपाडा येथील निलेश म्हसकर यांच्या कुडाच्या घराचे या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे नुकसान झाले आहे. या सर्वांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत शिवसेनेच्या वतीने बाधित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत केली. तसेच पुन्हा नव्याने घर उभारणीसाठी सिमेंटचे पत्रेही दिण्यात आले. तसेच शासनाकडून लवकर मदत देण्याची सूचना शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

नुकसानग्रस्त किनारपट्टी भागाची केली पाहणी व देण्यात आली तातडीची मदत

पालघरमधील सातपाटी, माहीम आणि उसरणी, एडवण येथील मच्छीमारांच्या बोटींचे चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले होते. मच्छिमारांच्या वादळात उध्वस्त झालेल्या नौका पाहून त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीची मदत देऊ केली. तसेच शासनाच्या वतीने त्याना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच सातपाटी, माहीम येथील मासेमारीच्या धकक्याचे चक्रीवादळात नुकसान झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून मेरिटाईम बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना अन्नधान्य वाटप

तौक्ते चक्रीवादळात बेघर झालेल्या कुटुंबियांना सरकाच्या वतीने यावेळी अन्नधान्य वाटप करण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही बेघर लोकांना प्रतिनिधीक स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांला 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि 5 लिटर रॉकेल मदत स्वरूपात देण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने हेल्थ किटचे वाटप

पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील आशा कर्मचारी, सफाई व आरोग्य कर्मचारी यांना फेस शिल्ड मास्क, एन-95 मास्क, सॅनिटायजर व हॅण्डग्लोव्ह्जचे वितरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

हेही वाचा - पाळणाघरात ठेवलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर दीड महिने लैंगिक अत्याचार, ५६ वर्षीय नराधम अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.