ETV Bharat / state

कचऱ्यातील पीपीईटी कीट घालून वसईत मनोरुग्णाचा वावर; आरोग्य यंत्रणेवर नागरिकांची टीका

author img

By

Published : Jul 6, 2020, 2:14 PM IST

कचऱ्यातील पीपीई कीट घालून मनोरुग्णाचा शहरात वावर होत असल्याचे समोर आल्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर टीका केली आहे. वापरलेले पीपीई किट मनोरुग्णाच्या हाती लागल्याने त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे स्पष्ट झालेय.

mad person were ppe kit
कचऱ्यातील पीपीई किट घातेलेला मनोरुग्ण

वसई(पालघर)- कोरोना महामारीशी लढताना होणाऱ्या चुकांमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. वसई शहरात एक मनोरुग्ण पीपीई किट घालून शहरात फिरत आहे. हे पीपीई किट या मनोरुग्णाकडे आले कुठून? असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे वसईतील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर टीका केली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामानंतर त्यांना देण्यात आलेल्या पीपीईटी किट, मास्क आणि ग्लोव्हज यांची योग्य ती विल्हेवाट लावावी, असे निर्देश आरोग्य खात्याने दिले होते. त्यामुळे या माध्यमातून कोविड-१९ प्रादुर्भाव होणार नाही, असा उद्देश यामागे होता; मात्र वसईत या निर्देशांचे पालन होत नसल्यानेच अशा प्रकारे पीपीई किट व मास्क मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांच्या हाती लागत आहेत.

कचरा वेचण्यासाठी ही व्यक्ती गावभर फिरत असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अशा बेफिकिरीमुळे या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर टीकेचा भडिमार केला आहे. कचऱ्यातून सापडलेल्या पीपीई किटमध्ये मनोरुग्ण वावरताना आढळल्याने आरोग्य यंत्रणेवर टीका होत आहे.याबाबत या मनोरुग्णाला विचारले असता; हा पीपीई कीट आपल्याला एका डॉक्टरने दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.

मध्यंतरी पीपीई किट आणि एन-९५ मास्क यांच्या तुटवडयामुळे काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवकांनी सेवा देण्यास नकार दिल्याच्याही बातम्या होत्या. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पीपीई किट आणि एन-९५ मास्कचा पुरवठा करण्यात आला होता. तर या कामी काही सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.