पालघर - जिल्ह्यातील केलवे पोलीस ठाणे क्षेत्रातील सागरी किनारा सुरक्षा ही आता उच्च प्रतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टप्प्यात आली आहे.
सागरी किनारा भागातील सागरी मार्गाने दहशतवादी कारवाया व हालचालीवर नजर आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आळा घालण्यासाठी, ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन नुकतेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते केलवे पोलीस ठाण्यात करण्यात आले, अशी माहिती केलवे सागरी किनारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.
याचा उपयोग येथील पर्यटन भागातील महिला सुरक्षा, काही पर्यटकांवर हालचालींवर नजर इतर आदी बाबीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसहभागातून 38 ठिकाणी उच्च प्रतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे ते काही 360 अंशात फिरणारे तर काही नाईट व्हिजन कलर एचडी फोकल कॅमेरे हे सितलादेवी मंदिर ट्रस्ट, केळवा शेतकरी सोसायटी, केलवे पर्यटन विकास संघ, मिठागर सोसायटी, कोळंबी प्रकल्प व्यावसायिक व इतर व्यवसायीक यांच्या लोक सहभागातून बसविण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील केळवे सागरी किनारपट्टी हद्दीत कोलंबी प्रकल्प आहेत. या कोलंबी प्रकल्पातून काही महिन्यापूर्वी कोलंबिची चोरी झाली होती. या भागत सागरी सुरक्षा बरोबरच नागरी सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. शिवाय हा भाग पर्यटन भाग आहे. येथील केळवा बिचवर पर्यटक समुद्र किनारी येत असतात. त्याचबरोबर शितलादवीचे मंदिर आहे. त्यामूळे पर्यटकांबरोबर भाविक येथे येत असतात. सागरी सुरक्षा लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटिल यांच्या प्रयत्नावरुन या पोलीस ठाणे हद्दीतील मदिर ट्रस्ट, शेतकरी व मीठागर सोसायटी, कोलबी प्रकल्प आदी सह इतर व्यवसायिकानी यांच्या मदतीने हा सागरी किनारा सीसीटीव्हीच्या आवाक्यात आणला आहे.
या सीसीटीव्हीने पालघरमधील केलवे सागरी सुरक्षा आवाक्यात आली असून तसेच इथल्या कोळंबी प्रकल्प चोरी प्रकरणे,आणि केलवा बीच या पर्यटनाची सुरक्षेवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे.