ETV Bharat / state

पालघरमध्ये गाडी भाड्याने मागवून चालकाला लुटणारे २ दरोडेखोर जेरबंद - OLA CABS IN PALGHAR

गाडी भाड्याने घेऊन चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून त्यांच्याकडून आठलक्ष किंमतीची मारुती सुझुकी एर्टीगा गाडी व एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

२ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Nov 22, 2019, 8:50 PM IST

पालघर- ओलाच्या माध्यमातून गाडी भाड्याने घेऊन चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व कार हस्तगत करण्यात आली आहे.

सचिन जयराम हांगे (वय २८) यांना ओला अॅपद्वारे वसई ते वापी येथे जाण्यासाठी बुकिंग मिळाली. हांगे हे आपली एर्टिगा कार घेऊन रात्री साडेअकराच्या सुमारास वसईच्या अंबाडी नाक्यावरून चार अज्ञातांना घेऊन वापी, गुजरात येथे जाण्यासाठी निघाले. वापीजवळ पोहचले असता चार जाणांपैकी एकाने 'हमारी युपी जानेवाली ट्रेन छुट गई है, हमे सुरत मे छोड दो' असे सांगितल्याने हांगे त्यांना सोडण्यासाठी सुरतकडे निघाले. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सुरतजवळ आल्यावर त्या चार प्रवाशांनी लघुशंकेसाठी गाडी रस्त्याच्या बाजुला थांबविण्यास सांगितली. बंदुकीचा धाक दाखवत चालकाचा मोबाईल व दहा हजार रुपये घेत ते हांगे यांची गाडी घेऊन फरार झाले होते.

माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने जोगेश्वरी येथील पुखराज चेनाराम जानी (वय १९) व वसईत राहणारा राकेशकुमार चंद्रभान बिश्नोई (वय १९) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आठलक्ष किंमतीची मारुती सुझुकी एर्टीगा गाडी राकेश कुमारच्या वसई येथील घराबाहेरून हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:गाडी भाड्याने मागवून चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी केली अटक .  Body:गाडी भाड्याने मागवून चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी केली अटक .  

पालघर /नालासोपारा : ओला च्या माध्यमातून गाडी भाड्याने घेवून त्याच्या चालकाला लुटणाऱ्या २ दरोडेखोरांना माणिकपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून गावठी कट्टा व कार हस्तगत केली आहे.सचिन जयराम हांगे, २८ यांना ओला अॅपदवारे वसई ते वापी येथे जाण्याकरीता बुकिंग मिळाल्याने हांगे यांनी अर्टिगा कार क्र.एम.एच- ०५/डि.के-२२४० हिच्याने रात्रौ २३.३० वा चे सुमारास वसई च्या अंबाडी नाका येथुन चार अज्ञात इसमांना घेवुन वापी, गुजरात येथे जाण्याकरीता निघाले वापी जवळ पोहचले असता चार इसमापैकी एकाने हमारी युपी जानेवाली ट्रेन छुट गई है तुम हमे सुरत मे छोड दो असे सांगितल्याने हांगे त्यांना सोडण्याकरीता सुरत येथे निघाले. दि.२७ ऑक्टोबर २०१९ रोजी पहाटे ०२.३० वा चे सुमारास सुरत पासुन ३५ कि.मी अंतर पुढे आल्यावर त्या चार प्रवाशांनी लघवीचा बहाणा करुन गाडी रस्त्याचे बाजुस थांबविण्यास सांगितले व गाडीचे खाली उतरुन फिर्यादी यांना गाडीचा खाली उतरवुन त्यांचा तोंडावर ठोश्याने मारहाण करुन तसेच त्यांच्या पैकि एकाने त्याचेकडील असलेल्या बंदुकीचा कटटयाचा हांगे धाक दाखवुन त्यांच्याकडील त्याचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन तसेच त्यांचा खिश्यातील दहा हजार रुपये जबरीने काढुन घेतले व त्यांना परत गाडीमध्ये पाठीमागील सिटमध्ये बसवून त्यांना त्याच दिवशी सकाळी ०४.३० वाजताच्या सुमारास कर्जन टोल नाका, गुजरात येथे उतरवुन टाकुन ते हांगे यांची गाडी घेवुन फरार झाले होते.माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी  जोगेश्वरी येथे राहणारा पुखराज चेनाराम जानी, वय १९ ,  व वसईत राहणारा राकेशकुमार चंद्रभान बिश्नोई, वय १९ यांना अटक करून त्यांच्या कडील ८,००,००० किंमतीची मारुती सुझुकी अर्टीगा कार ही ५,०००किमतीचा एक लाकडी मुठीचा आवरण असलेला लोखंडी कटटा राकेश कुमारच्या वसई येथील घरातुन हस्तगत करण्यात आलेला आहे.या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.    Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.