पालघर (वाडा) - पावसाच्या महापुराने वाड्यात थैमान घातले आहे. यात पिंजाळ नदीच्या पुराने अखेर मलवाडा पुल वाहून गेला. येथील पिंजाळ नदीच्या काठी असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तसेच आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीत पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
याआधीही वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीला पूर आला असताना मलवाडा पूल वाहून गेला होता. आणखी एकदा असाच प्रकार झाला असून, प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.