पालघर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती निश्चित झाली आहे. मात्र, चर्चेत असलेल्या नालासोपारा विरारमध्ये स्थानिक युती तुटणार असल्याची चिन्हे आहेत. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले प्रदीप शर्मा यांना दिलेल्या या मतदारसंघामध्ये दिलेल्या उमेदवारीमुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
हेही वाचा - अखेर आघाडीचे गणित ठरले! जागावाटपात राष्ट्रवादीची सरशी ?
नालासोपारा पूर्वेकडील शादी डॉटकॉम या हॉलमध्ये भारतीय जनता पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना संतापाची वाट मोकळी केली. पालघर लोकसभेच्या जागेवर महायुतीतर्फे शिवसेनेने भगवा फडकविल्यानंतर वसई व नालासोपारा हे दोन्ही मतदार संघावर भगवा झेंडा फडकविण्याच्या प्रयत्नात महायुती दिसत आहे. त्यानुसार शिवसेनेकडून नव्याने इनकमिंग झालेल्या एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपऱ्यातून तर वसई विधानसभा क्षेत्रातून भूमिपुत्र विजय पाटील या दोघांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, स्थानिक भाजप पदाधिकाऱयांचे काय ? असा सवाल वसईतील भाजप पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - 'विधानसभा एकत्रच लढणार'; नाना पटोलेंच्या वक्तव्याने आघाडी कायम राहण्याचे संकेत
महायुतीने घेतलेले निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून घेतला असल्याचा आरोप स्थानिक भाजप कार्यकर्ते करीत आहेत. याउलट पालघर लोकसभेची सीट ही भाजपाकडे होती ती आम्ही उमेदवारासह शिवसेनेकडे दिली. इतकी वर्षे आम्ही वसईत भाजपची ताकद ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले, असे असताना स्थानिक भाजपचा विचार केला जात नसल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत.