पालघर/ विरार- कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे गाडीच ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली होती. ही गाडी गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र लंपास करण्यात आली आहे.
विरार पश्चिमेकडील बोडीन भागात असलेल्या कोटक महेंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली गाडी ड्रायव्हरने गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळून देण्याची धक्कादायक घटना घडली होती. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या गाडीमध्ये 4 कोटी 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते. यावेळी सव्वाचार कोटी रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडी आली असता. गाडीतील लोडर आणि बॉडीगार्ड उतरल्यावर ड्रायव्हर गाडी घेऊन पळून गेला.
नंतर ही गाडी भिवंडी तालुक्यातील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली आहे. यातील सव्वाचार कोटी रुपये घेऊन आरोपी आरोपी ड्रायव्हर पसार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी तीन टीम बनवण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी ड्रायव्हरची ओळख, घरचा पत्ता, कागदपत्रे पोलिसांना सापडले असून लवकरच आरोपीही सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू