ETV Bharat / state

कोळंबी प्रकल्पातून कोळंबी चोरी... प्रकल्प मालक हतबल - palghar latest news

पालघर तालुक्यातील सफाळ्याच्या पश्चिम भागात दातिवरे ते जलसार दरम्यान असलेल्या वेढी, टेम्भिखोडावे, डोंगर, खार्डी, विळंगी त्याचप्रमाणे केळवे- माहीम परिसरात तीनशे ते साडेतीनशे लहान मोठे कोळंबी प्रकल्प आहेत.

kolambi-fish-stolen-from-kolambi-project-in-palghar
कोळंबी प्रकल्पातून कोळंबी चोरी.
author img

By

Published : Jun 25, 2020, 3:05 PM IST

पालघर- तालुक्यातील सफाळे गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या सुमारे साडेचार ते पाच हजार एकर क्षेत्रात साडे तीनशे कोलंबी प्रकल्प आहेत. मात्र, या प्रकल्पातून कोळंबी चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. दिवसाढवळ्या चोरीचे हे प्रकार सुरू झाल्याने प्रकल्प मालक हतबल झाले आहेत.

कोळंबी प्रकल्पातून कोळंबी चोरी.
पालघर तालुक्यातील सफाळ्याच्या पश्चिम भागात दातिवरे ते जलसार दरम्यान असलेल्या वेढी, टेम्भिखोडावे, डोंगर, खार्डी, विळंगी त्याचप्रमाणे केळवे- माहीम परिसरात तीनशे ते साडेतीनशे लहान मोठे कोळंबी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प खाडी व समुद्र किनाऱ्यालगत खाजण व दुर्गम भागात आहेत. या प्रकल्पातून रात्रीच्या वेळी देखील कोळंबी चोरी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. लाखो रुपयांच्या कोळंबीची चोरी या परिसरात होत असल्यामुळे कोळंबी प्रकल्प मालक हतबल झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात सफाळे व केळवे पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, यावर उपाययोजना आखली जात नसून हा व्यवसाय सुरू ठेवणे प्रकल्प मालकांसमोर आव्हानात्मक ठरत आहे.कोळंबी प्रकल्पावर असलेल्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तळ्याच्या कोपऱ्यात खाद्यपदार्थ टाकून कोळंबी एकत्रित कोपर्‍यात आणले जाते. नंतर लहान जाळ्याच्या माध्यमातून कोळंबी वेचल्या जातात. लॉकडाऊनच्या काळात चोऱ्यांच्या प्रकारामध्ये वाढ झाल्याचे प्रकल्प मालकांचे म्हणणे आहे. चोरी करण्यासोबत तळ्यामधील पाण्यामध्ये अस्वच्छ जाळी व इतर सामुग्रीमुळे विषाणू पसरण्याची अधिक भीती असते. एप्रिल ते जून दरम्यान कोळंबी प्रकल्पातून उत्पादन (हार्वेस्टिंग) घेतले जाते. 15-20 ग्राम वजनाची कोळंबी 350 रुपये प्रति किलो, तर 50 ग्राम वजनाची कोळंबी 550- 600 रुपये किलो दराने सध्या मुंबईमध्ये विकली जाते. या भागातील अधिकतर उत्पादन निर्यात होत असून त्यापोटी देशाला करोडो रूपांचे परकीय चलन मिळत असते.मात्र लॉडाऊनच्या काळात या उत्पादन घेतलेल्या कोळंबीची विक्री करणे किंवा उत्पादन घेण्यासाठी अधिक प्रमाणात मनुष्यबळ आणणे प्रकल्प मालकांना शक्य नव्हते. याचा फायदा घेऊन येथील चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरलेल्या कोळंबी घरगुती खाण्यासाठी तसेच मासळी बाजारमध्ये विक्रीसाठी नेली जात असल्याचे कळते. मात्र, कोळंबी चोरीच्या या प्रकारामुळे प्रकल्प मालक व व्यवस्थापन कर्मचारी हतबल झाल्याचे चित्र आहे. याविषयी कोलंबी प्रकल्प मालकांनी महाराष्ट्र ऍक्वाकल्चर फार्मर्स असोसिएशनच्या माध्यमातून स्थानिक पोलीस ठाण्यापासून थेट उप मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार नोंदवली आहे. मात्र, त्याचा विशेष फायदा झालेला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या अशाच एका प्रकारात उत्पादन (हार्वेस्टिंग) करायला आलेल्या एका तळ्यामधील कोळंबी शेकडोंच्या संख्येने चोरी करण्याचा प्रकार एका व्हिडिओमध्ये बंदिस्त झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.