ETV Bharat / state

Special Story : किसान रेल्वेमुळे डहाणू - घोलवड चिकू व्यापार गतिमान; गतवर्षी 35 हजार टन चिकूची वाहतूक - डहाणू चिकू व्यापार

देशभरात प्रसिद्ध असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू किसान रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या 24 तासांत दिल्लीला पोहचत असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Kisan Railway Dahanu Gholwad Chiku trade
डहाणू घोलवड चिकू व्यापार
author img

By

Published : Mar 2, 2022, 3:58 PM IST

पालघर - जिल्ह्यात तब्बल पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर चिकू लागवड केली जात असून, या भागात दीडशे ते दोनशे टन प्रती दिवस इतके चिकूचे उत्पादन घेतले जाते. देशभरात प्रसिद्ध असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू किसान रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या 24 तासांत दिल्लीला पोहचत असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती देताना शेतकरी

हेही वाचा - Viral Video : विरारमध्ये प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत तिच्या अंगावर उधळले नोटांचे बंडल..

गेल्या वर्षभरात डहाणू परिसरातील तब्बल 35 हजार टन चिकूची वाहतूक माफक दरात दिल्लीपर्यंत करण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेलमुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

ट्रकने चिकू वाहतुकीमुळे शेतकऱ्यांचे होते आर्थिक नुकसान -

यापूर्वी चिकूची वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर केला जात असे व त्या दरम्यान या भागातून आठ ते दहा टन चिकू फळ पोहचण्यास 30 ते 32 तास लागत असत. ट्रकमध्ये एकावर एक चिकूचे अनेक बॉक्सेस रचून ठेवल्यामुळे खालच्या बॉक्समधील फळे दबली जाऊन त्याच्या दर्जावर परिणाम होत असे. तसेच बंदिस्त ट्रकमधील उष्ण वातावरणात चिकूचे पिकण्याचे प्रकार घडत असल्याने शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसे. वाहतुकीदरम्यान होणाऱ्या सर्व नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागे. त्यामुळे थंडीच्या सुमारास अवघ्या 12 ते 18 रुपये प्रति किलो या दराने हे फळ बाहेरगावच्या मार्केटमध्ये पूर्वी विकले जात असे.

किसान रेल्वेची जलद वाहतूक चिकू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरली लाभदायक -

किसान रेलच्या माध्यमातून चिकू अवघ्या 24 तासांत दिल्लीला बाजारपेठेत पोहचत आहे. रेल्वे वाहतूक करताना एकावर एक असे तीन-चार इतकीच बॉक्सेस रचली जात असल्याने, तसेच रेल्वे डब्यांच्या एकंदर रचनेमुळे वाहतुकीदरम्यान हवा खेळती राहत असून, चिकू फळ खराब होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. फळे काढल्यानंतर ते खाण्यास योग्य असल्याचा कालावधी सरासरी चार ते सहा दिवसांचा असल्याने लवकरात लवकर व ताज्या स्थितीत बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याचे आव्हान किसान रेल्वेने साध्य केले आहे.

सध्या डहाणू - घोलवड येथील चिकू 15 ते 22 रुपये प्रति किलो इतक्या दराने विकला जात असून, किसान रेल येथील बागायतदारांसाठी वरदान ठरले आहे. यापूर्वी ट्रकद्वारे चिकू वाहतुकीसाठी प्रतिकिलो पाच - सहा रुपये येणारा खर्च सध्या किसान रेल माध्यमातून एक रुपये 80 पैसे प्रति किलोसह 3.50 रुपये प्रत किलो इतका कमी झाल्याने त्याचा लाभ येथील बागायतदारांना होत आहे. या शिवाय फळाचा दर्जा रेल्वे वाहतूक दरम्यान राखला जात असल्याने वाहतूक लाभदायक ठरत आहे.

वर्षभरात 35 हजार टन चिकूची किसान रेल्वेने वाहतूक -

28 जानेवारी 2021 पासून किसान रेल्वे सेवेची डहाणू येथून सुरुवात झाली. आरंभी डहाणू येथून सहा डबे व उर्वरित डबे गुजरात राज्यातून भरून ही गाडी 22 ते 24 तासांत दिल्ली येथे पोहचत असे. कालांतराने चिकूचे उत्पन्न वाढल्यानंतर डहाणू येथून अनेकदा वीस डब्यांची गाडी पूर्णपणे भरून ही विशेष मालसेवेची गाडी दिल्लीपर्यंत 20-21 तासांत पोहचू लागली. जानेवारी ते मार्च 2021 या काळात डहाणूवरून 21 गाड्यांमधून 11.78 लक्ष चिकू बॉक्सेसची वाहतूक करण्यात आली. करोनाच्या काळात काही काळ ही सेवा खंडित राहिल्यानंतर पुन्हा एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत 102 विशेष किसान रेल गाड्यांमधून 23.38 लक्ष चिकू बॉक्सेस वाहतूक झाली. गेल्या वर्षभरात डहाणू परिसरातील तब्बल 35 हजार टन चिकूची वाहतूक माफक दरात दिल्ली पर्यंत करण्यात आली.

सुरक्षित प्रवासाचा विस्तार करण्याची मागणी -

चिकू फळाचा रेल्वेच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास होत असला तरी फळाच्या लोंडींग-अनलोंडींग खर्चावरील कपात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फळाचे हंगाम नसल्यास 20 डब्यांच्या गाडीच्या नियमांमध्ये शिथिलता आणून 15 डब्यांची किसान गाडी सोडण्याची मागणी येथील बागायतदार करीत आहेत. फळाची अवाक कमी असल्यास डहाणू - वलसाड भागातून एकत्र गाडी सोडण्याचे प्रयोजन करण्यात यावे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. चिकूसह काही डब्यांमध्ये भाजीपाला वाहतूक केल्यास शेतकरी वर्गाला सोयीचे ठरणार असून, कृषी विभागाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे. तसेच, दिल्लीसह आग्रा, मथुरा, जयपूर व पंजाबकरिता थेट किसान रेल सेवा सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा - Anti Encroachment Drive at Virar Beach : विरार-अर्नाळा समुद्रकिनारी तहसील विभागाची धडक कारवाई; ५० झोपड्या; २५ ढाबे जमीनदोस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.