पालघर/वसई - वसई-पाचूबंदर येथील समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी बोटीला काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याचे कळते आहे.
वसई-पाचूबंदर येथील समुद्रकिनारी बांधून ठेवलेल्या बोटीचा दोर सुटल्याने ही मासेमारी बोट समुद्रात वाहून गेली होती. या बोटीला काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरवण्यात आला होता; मात्र, त्याचवेळी भरती आल्याने हा जेसीबी समुद्रात बुडाला. जेसीबी बाहेर काढण्यासाठी आता ओहोटीची वाट पाहावी लागणार आहे. हा प्रकार पाचूबंदर आणि मर्सिस समुद्रकिनारीच्या मध्यवर्ती भागात घडला आहे.