ETV Bharat / state

पालघर आयटीआयतील विद्यार्थ्यांने तयार केली 'सोलार बोट' - palghar solar boat news

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सोलार बोटीचा आविष्कार केला आहे. प्रदूषण करणाऱ्या इंधनाला हा एक अत्यंत चांगला पर्याय या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही सोलार बोट सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे

iti students build solar boat in palghar
पालघर आयटीआयतील विद्यार्थ्यांने तयार केली 'सोलार बोट'
author img

By

Published : Jan 5, 2021, 4:26 PM IST

पालघर - अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पारंपारिक उर्जेचा पुरेपूर वापर करत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सोलार बोटीचा आविष्कार केला आहे. प्रदूषण करणाऱ्या इंधनाला हा एक अत्यंत चांगला पर्याय या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही आगळी वेगळी संकल्पना भविष्यात उपयोगी ठरणार असून ही सोलार बोट सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तसेच याच विद्यार्थ्यांनी आठ-नऊ महिन्यांपूर्वी भांगरातून विकत घेतलेल्या व्हॅनचे रूपांतर सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर व्हॅनमध्ये केले होते.

प्राचार्यांची प्रतिक्रिया

सोलार बोट बनविण्यासाठी 90 हजार रुपये खर्च -

शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थेत वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत बहुतांश विद्यार्थी ग्रामीण क्षेत्रातील आहेत. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनेला संस्थेतील शिक्षक त्यांच्या उपक्रमांना बळ देत आहेत. नव्याने बनवण्यात आलेल्या सोलर बोटीला 90 हजार खर्च आला आहे. या बोटीतून साधारणता चारशे किलो वजनाची वाहतूक होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

मासेमारी, पर्यटनासाठी ठरू शकते उत्तम पर्याय -

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. तसेच पालघर हा समुद्र किनारपट्टीचा प्रदेश आहे. त्यामुळे पर्यटनाला व्यवसायालाही भरपूर वाव आहे. भविष्यात या सोलर बोटीचा छोट्या मासेमारी व्यवसायासाठी वापर करता येऊ शकतो. ही सोलार बोट छोटी मासेमारी व पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास औद्योगिक संस्थेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा - देवदर्शनासाठी निघालेल्या युवकांच्या गाडीला अपघात, तिघे ठार चौघे जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.