ETV Bharat / state

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अन्याय; आधी जिल्ह्यातील शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली- समुपदेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी गोंधळ घातला आहे. ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

आपल्या मांगण्या सांगतांना पालघर जिल्ह्यातील शिक्षक
author img

By

Published : Jun 17, 2019, 5:16 PM IST

पालघर- जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली- समुपदेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी गोंधळ घातला आहे. ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

आपल्या मांगण्या सांगतांना पालघर जिल्ह्यातील शिक्षक

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील एकूण ३३८ प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले आहे. विस्थापित झालेल्या ३३८ प्राथमिक शिक्षकांमध्ये १९० महिला शिक्षिकांचा समावेश आहेत. बदली प्रक्रियेत अन्याय झाला असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे . प्रथम या शिक्षकांचे समायोजन करा व नंतर बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करा. तसेच ग्रामीण विकास विभाग शासननिर्णय २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणे बदली प्रक्रिया राबवा, अशी मांगणी शिक्षकांद्वारे केली जात आहे.

सन २०१७ - १८ अंतर्गत कोकण जिल्ह्यापैकी पालघर जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदल्यांवेळी सरळ बदली पोर्टलमध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा स्तरावरील बदली प्रक्रियेत शासनाने आवश्यक सुधारणा करून पारदर्शक पणे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. तसेच ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणे या बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षकांनी केला आहे. त्याचबरोबर ठाणे व नंदुरबार जिल्ह्यात पेसा कायद्याप्रमाणे बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातही पेसा कायद्याप्रमाणे बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणीही या शिक्षकांनी केली आहे.

बदली प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासनामार्फत अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याबाबत सायंकाळी पाच वाजता खुलासा करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत संदेश देण्यात आला आहे.

Intro: जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली- समुपदेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी गोंधळ घातला. ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली नसल्याचा आरोप शिक्षक काही करीत आहेत.Body: जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली- समुपदेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी गोंधळ घातला. ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली नसल्याचा आरोप शिक्षक काही करीत आहेत.

नमित पाटील,
पालघर, दि. 18/6/2019

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली- समुपदेश प्रक्रियेदरम्यान शिक्षकांनी गोंधळ घातला. ही बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली नसल्याचा आरोप शिक्षक करीत आहेत.

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत पालघर जिल्ह्यातील एकूण 338 प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले असून त्यांच्यावर या प्रक्रियेत अन्याय झाला आहे. प्रथम या शिक्षकांचे समायोजन करा व नंतर बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करा बदली. तसेच ग्रामीण विकास विभाग शासननिर्णय 27 फेब्रुवारी 2017 च्या परिपत्रकाप्रमाणे बदली प्रक्रिया राबवा या मागणीवर शिक्षक ठाम आहेत.

पालघर जिल्ह्यात एकूण 338 शिक्षक विस्थापित झाले आहेत त्या पैकी 190 महिला शिक्षिका आहेत या बदली प्रक्रियेत झाला असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे सन 2017 - 18 अंतर्गत कोकण जिल्ह्यांपैकी पालघर जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदल्यांमध्ये ते सरळ बदली पोर्टलमध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा स्तरावरील बदली प्रक्रियेत आवश्यक सुधारणा शासनाने करून पारदर्शक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. तसेच ग्रामविकास विभागाच्या 27 फेब्रुवारी 2017 च्या परिपत्रकाप्रमाणे बदल्या कराव्यात व ठाणे नंदुरबार या जिल्ह्यात पेसा कायद्याप्रमाणे बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे, याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्यातही पेसा कायद्याप्रमाणे बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.

बदली प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासनामार्फत अद्याप पर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही याबाबत सायंकाळी पाच वाजता खुलासा करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत संदेश देण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.