ETV Bharat / state

शिवभोजन योजनेचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

author img

By

Published : Jan 26, 2020, 9:50 PM IST

शिवभोजन' योजनेचा आज पालघर येथे राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.

उद्घाटन करताना पालकमंत्री व अन्य
उद्घाटन करताना पालकमंत्री व अन्य

पालघर - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी व महाविकास आघाडीच्या 'शिवभोजन' योजनेचा आज (दि. 26 जानेवारी) पालघर येथे राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पालघर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात एकवीरा महिला बचत बचत गटाच्या माध्यमातून ही शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे.

बोलताना पालकमंत्री भुसे

गरीब व गरजू व्यक्तींना 10 रुपयांत पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे, असे पदार्थ मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यात शिवाभोजन योजनेअंतर्गत 450 थाळी देण्यात येणार असून या योजनेचा लाभ गरीब गरजू व्यक्तींना घेता येणार आहे. भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा - वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा

शिवभोजन या योजनेसाठी मोबाईल अ‌ॅपची निर्मिती करण्यात आली असून शिवभोजन करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र या अ‌ॅपव्दारे काढण्यात येणार आहे. यामुळे या योजनेत पारदर्शकता असेल. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंपळे, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांसह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक; 15 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

Intro:शिवभोजन' योजनेचा आज पालघर येथे राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ 
Body:शिवभोजन' योजनेचा आज पालघर येथे राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ 

नमित पाटील,
पालघर, दि.26/1/2020

     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी व महाविकास आघाडीच्या 'शिवभोजन' योजनेचा आज पालघर येथे  राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पालघर पंचायत समिति कार्यालयाच्या आवारात  एकविरा  महिला बचत बचत गटाच्या माध्यमातून ही शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. 

       गरीब व गरजू व्यक्तींना 10 रुपयांत पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून, या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यात शिवाभोजन योजनेअंतर्गत 450 थाळी देण्यात येणार असून या योजनेचा लाभ गरीब गरजू व्यक्तींना घेता येणार आहे.भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.  

      शिवभोजन या योजनेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली असून शिवभोजन करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र या ॲपव्दारे काढण्यात येईल यामुळे या योजनेत पारदर्शकता असेल. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या  अध्यक्षा ज्योती ठाकरे,  खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंपळे, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन आदींसह मान्यवर उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.