पालघर/विरार - नालासोपारा येथे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्धाटन सोहळा पार पडला. करण्यात आले. वसई -विरारमधील गुन्ह्यांच्या विविध प्रकारांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांवर ताण येत होता. नालासोपारा शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, अनेक गुन्हे, चोरीच्या घटना रोज घडत असतात. गुन्हेगारीला आला घालण्यासाठी स्वतंत्र्य सह आयुक्तालयाची गरज होती. आता या कार्यालयामुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसणार असल्यची शक्यता आहे. या सहआयुक्त कार्यलायाचा कार्यभार वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे
हेही वाचा- मोदींनी बांगलादेशात दंगल पेटवली, आता आटोक्यात आणावी -सामनातून खरमरीत टीका
नालासोपाऱ्यातील डीवायएसपी त्यांच्याकडे यापूर्वी नालासोपारा ईस्ट-वेस्ट हे दोन्ही भाग देण्यात आले होते. परंतु आता नव्याने सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय झाल्याने नालासोपारा वेस्ट पोलीस स्टेशन,अर्नाळा पोलीस स्टेशन, बोळींज पोलीस स्टेशन असे तिन्ही पोलीस स्टेशन या कार्यालयाच्या अंतर्गत राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाचे उद्घाटन साध्या पद्धतीने करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी दिली.
हेही वाचा- मिठी नदीत सापडलेला डीव्हीआर सचिन वाझेच्या सोसायटीचा, अनेक गूढ उलगडणार