पालघर - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आज (दि. 16 नोव्हे.) पालघर, ठाणे जिल्ह्यातील जवळपास 5 हजार आशासेविका, परिचारिकांसोबत कृतज्ञता भाऊबीज साजरी करण्यात आली. महिला डॉक्टर, परिचारिका व आशासेविका स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. या कोरोना योद्ध्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची जाणीव ठेवून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वत्र कृतज्ञता भाऊबीज साजरी करण्यात आली.
कोरोनाने जगाला वेठीस धरले असून डॉक्टर, पोलीस तसेच आरोग्य कर्मचारी यांसारखे कोरोना योद्धे आपल्या जिवाची पर्वा न कोरोनाविरुद्धच्या या लढाईत दिवस रात्र मेहनत करून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. देशात प्रत्येक घरात दिवाळी, भाऊबीज साजरी केली जात असताना आजही महिला डॉक्टर्स, परिचारिका, आशासेविका बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी झटत आहेत. स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी झटणाऱ्या महिला आशासेविका, परिचारिका व महिला डॉक्टर यांनी केलेल्या रुग्ण उल्लेखनीय कार्याची जाणीव ठेवून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर, ठाणे जिल्ह्यातील जवळपास 5 हजार महिला डॉक्टर्स, परिचारिका, आशासेविकांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊबीज साजरी करण्यात आली.